Ranbir Kapoor Video got angry with the paparazzi, the video went viral  SAKAL
मनोरंजन

Ranbir Kapoor Video: "काय हवंय तुला?" पुन्हा एकदा पापाराझीवर चिडला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन तो पापाराजींवर संतापला आहे.

Devendra Jadhav

Ranbir Kapoor Video News: रणबीर कपूर हा बॉलिवूड मनोरंजन विश्वातला लोकप्रिय अभिनेता. बर्फी, रॉकस्टार, जग्गा जासूस अशा अनेक सिनेमांमधून रणबीरने त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे.

रणबीर सोशल मीडियावर सक्रीय नाही. पण रणबीर कपूरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रणबीरचा असाच एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात रणबीर पापाराझींवर भडकलेला दिसतोय. काय झालंय नेमकं? जाणुन घ्या.

काय हवंय तुला? रणबीर पापाराझींवर भडकला

रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये रणबीर एका इमारतीतून बाहेर पडून त्याच्या कारकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझी वारंवार त्याला थांबायला सांगताना दिसत आहेत. याशिवाय फोटोसाठी पोज देण्यास सांगत आहेत. यावर रणबीर चिडून म्हणतो- "काय हवंय तुला? काय करु नेमकं?" यानंतर रणबीर पापाराझींना फोटो न देताच वैतागून कारमध्ये निघून जातो.

रणबीरच्या अ‍ॅनिमलची उत्सुकता

 बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. त्याचा आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाल्यानंतर चाहते या सिनेमासाठी उत्सूक आहे. त्यातच या चित्रपटातील पहिल्या गाण्याने देखील सोशल मिडियावर धुराळा उडवला आहे.

रणबीर अभिनयातुन घेणार ब्रेक?

रणबीर त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' आणि 'रामायण' चित्रपटासाठी चर्चेत आहे. मात्र आता रणबीरच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. रणबीर हा काही दिवस अभिनयातून ब्रेक घेणार असल्याची घोषणा त्याने स्वत:च केली आहे. रणबीरने काही दिवसांपुर्वी झूम कॉलच्या माध्यमातुन चाहत्यांशी संवाद साधताना ही गोष्ट सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT