Rani Mukherjee Bollywood Actress  esakal
मनोरंजन

'Rani Mukherjee : 'वय नाही तुम्हाला अभिनय येतो का हे जास्त महत्वाचं'! राणीनं कुणावर साधला निशाणा?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही नेहमीच तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते.

युगंधर ताजणे

Rani Mukherjee Bollywood Actress : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही नेहमीच तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिनं इफ्फीमध्ये केलेल्या त्या वक्तव्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली असताना आता पुन्हा तिनं वय आणि कलाकारांना मिळणाऱ्या भूमिका यावरुन केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

राणी म्हणते, मी जेव्हा वीस वर्षांची होते तेव्हा माझ्या वाट्याला आईची भूमिका आली होत.मी ती प्रामाणिकपणे केली. मला ती भूमिका साकारताना कुठलाही कमीपणा जाणवला नाही. माझ्या तिसऱ्या चित्रपटात देखील मला आईची भूमिका करावी लागली. त्या चित्रपटाचे नाव कुछ कुछ होता है असे होते. तसेच ता रा रम पम या चित्रपटामध्ये देखील मी दोन मुलांची आई ही भूमिका निभावली होती.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

राणी म्हणते, कलाकारानं त्याच्या वाट्याला जे काम येतं ते प्रामाणिकपणे करावं. काही भूमिका तुम्हाला खूप काही शिकवून जातात. त्यातून तुम्ही घडता. अमूक एखादी भूमिका तुम्हाला सुट होत नाही, तुमच्या वयापेक्षा ती जास्त आहे अशावेळी त्या भूमिकेला कसा न्याय देता येईल याचा विचार जास्त महत्वाचा शेवटी तुम्हाला अभिनय येतो की नाही हे त्या भूमिकेतून समोर येते. जे कुणी त्यावरुन तुमचे मुल्यमापन करतात त्यांना मला सांगायचे आहे की, वय नव्हे तर तुमचा अभिनय जास्त महत्वाचा आहे.

तुमच्या वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका तुमच्या वाटेला आल्या की, तुम्ही नाराज न होता त्या भूमिका आणखी कशा प्रभावीपणे करता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. माझी नेहमीच एक भूमिका राहिली आहे ती म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांना त्या भूमिकेतून नवं काय देऊ शकेल याचा विचार जास्त महत्वाचा आहे. त्यातून मिळणारं समाधान मोठं आहे.

राणीच्या मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला चित्रपट समीक्षकांकडून देखील गौरविण्यात आले होते. आशिमा छिब्बर यांनी दिग्दर्शित केलेला तो चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणी तिच्या मर्दानी ३ मध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे दिग्दर्शन गोपी पुथरन हे करणार आहे.

राणीच्या मर्दानी ३ च्या चित्रिकरणाला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. राणीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास तिनं निर्माता आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केलं असून तिला एक मुलगी आहे. तिचे नाव आदिरा असे आहे. काही मुलाखतींमधून राणीनं आपल्या कुटूंबाविषयी केलेलं भाष्य चर्चेत आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT