Ranveer Singh news  esakal
मनोरंजन

Ranveer Singh: 'टेन्शन नही लेनेका और...' टाटा सन्सच्या एन. चंद्रशेखर यांचा भन्नाट सल्ला

बॉलीवूडचा अभिनेता रणवीर हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचं न्युड फोटोशुटनं लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

युगंधर ताजणे

Bollywood Actor Ranveer Singh: बॉलीवूडचा अभिनेता रणवीर हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचं न्युड फोटोशुटनं लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल होते. त्यावरुन अनेकांना मोठा धक्काही बसला. आपल्या आवडत्या अभिनेत्यानं अशा प्रकारचे फोटोशुट करणे हे कित्येकांना आवडलं नाही. त्याचा (Bollywood Actor) परिणाम असा की त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. दुसरीकडे अनेक बॉलीवूडचे सेलिब्रेटी रणवीरच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले आहे. त्यात काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींपासून आलिया भट्ट पर्यत यांचा समावेश आहे.

आता टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी रणवीरला एक भन्नाट सल्ला (entertainment news) दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीर हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आयएए लिडरशीप पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या एन चंद्रशेखर यांचे ते भाषण व्हायरल झाले आहे. त्या सोहळयाला देशातील वेगवेगळे उद्योगपती उपस्थित होते. यावेळी रणवीर सिंग, सोनु सूद यांनी देखील हजेरी लावली होती. आपल्या फोटोशुटवर रणवीरनं एन चंद्रशेखर यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली. त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून रणवीरला हसू आवरेना.

चंद्रशेखरन यांनी रणवीरला एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, हे बघ रणवीर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. आणि कुणाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करायचा नाही. चंद्रशेखर यांनी रणवीरला टाइम मॅनेजमेंट यावरुन हा सल्ला दिला आहे. त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी चंद्रशेखर यांनी रणवीरचं कौतूकही केलं. ते म्हणाले, तू एक उत्साही अभिनेता आहे. तुझं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. माझ्याकडे तुझ्याइतकी उर्जा असती किमान त्यातील 10 टक्के तरी...मी काही वेगळा झालो असतो.

रणवीरनं चंद्रशेखर यांना कोरोनामुळे मनोरंजन विश्वावर झालेल्या परिणामबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी, याचा जास्त विचार करण्याची काही गरज नाही. केवळ मनोरंजनच नाहीतर अनेक सेक्टरला त्याचा फटका बसला आहे तेव्हा टेन्शन काही घेऊ नका. असेही चंद्रशेखर यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT