Rashmika Mandanna Actress share Disc Issue  esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिकानं केला आजारपणाचा मोठा खुलासा, 'त्या' दुखण्यानं केलं हैराण!

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही अॅनिमल चित्रपटामुळे भलेही लाईमलाईटमध्ये आली असेल मात्र तिच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांना प्रश्नात टाकले आहे.

युगंधर ताजणे

Rashmika Mandanna Actress share Disc Issue : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही अॅनिमल चित्रपटामुळे भलेही लाईमलाईटमध्ये आली असेल मात्र तिच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांना प्रश्नात टाकले आहे. रश्मिकानं गेल्या काही दिवसांपासून आपल्याला एका शाररिक समस्येला सामोरं जावं लागल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ती पोस्ट व्हायरल झाली आहे.

तो त्रास झाला असह्य...

रश्मिरानं एक्सवर शेयर केलेल्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्रीनं म्हटलं आहे की, मला डिस्कचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे मी खूपच त्रस्तही झाले होते. उपचार सुरु होते. फिजिओनं कशाप्रकारे व्यायाम करायला हवा, कोणते उपचार घ्यायला हवेत याविषयी सांगितले होते. त्यानुसार वेळापत्रकही तयार केले होते.

मी वर्कआऊटवर खूपच भर दिला होता. त्यामुळे आता मला त्याचा फायदा होत आहे. आता तो त्रास बऱ्याच अंशी कमी झाला आहे. पुढे काही दिवसांनी फिजिओ केल्यानंतर त्यातील सुधारणा दिसून आली होती. आता मी रोज स्ट्रेचिंग करते आहे. त्याचा फायदा होतो आहे. असेही रश्मिकानं म्हटले आहे.

या चित्रपटाच्या चित्रिकरणात रश्मिका व्यस्त...

रश्मिकानं ती पोस्ट शेयर करताना हार्ट इमोजीही शेयर केला आहे. ज्याची चर्चा आहे. संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल चित्रपटामध्ये रश्मिका मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. तिनं तिच्या भूमिकेनं चाहत्यांना प्रभावित केले होते. यानंतर ती पुष्पा २- द रुल मध्ये दिसणार असून त्याच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत.

पाचशे कोटींचा टप्पा पार केला...

वांगा रेड्डीच्या अॅनिमलनं पाचशे कोटींचा टप्पा पार केल्याचे दिसून आले आहे. प्रदर्शित झाल्यापासून अॅनिमलवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. प्रेक्षकांची त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या करिअऱमधील हा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये रश्मिका मंदाना, शक्ती कपूर, अनिल कपूर, सुरेश ऑबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.

अॅनिमलच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं आतापर्यत देशभरातून पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे तर परदेशातून हा आकडा तीनशे कोटींच्या पुढे गेला आहे. एकुण अॅनिमलची कमाई ही आठशे कोटींच्या जवळपास आल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT