rasika sunil and aditya bilagi 
मनोरंजन

रसिका सुनीलच्या प्रपोजलची चर्चा; तिचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण?

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलच्या आयुष्यात प्रेमाची कळी उमलली आहे. रसिकाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या प्रपोजलचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याचीच चर्चा सुरु झाली. आदित्य बिलागी या तरुणाला ती डेट करत असून त्याने कशाप्रकारे तिला प्रपोज केलं, याचा व्हिडीओ तिने पोस्ट केला होता. प्रपोज करण्याआधी आदित्यने तिची हेलिकॉप्टरमधून लॉस एंजिलिस या शहराची सफर घडवून आणली. त्यानंतर ज्या ठिकाणी हे दोघं पहिल्यांदा फिरायला गेले, त्या ठिकाणी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. रसिकाने फोटो पोस्ट केल्यापासून हा आदित्य आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली. 

आदित्य आणि रसिकाची पहिल्यांदा ओळख ही लॉस एंजिलिसमध्येच झाली. तो इंजीनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. आदित्यचा स्वत:चा युट्यूब चॅनल असून त्याचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. या युट्यूब चॅनलवर तो डान्सचे विविध व्हिडीओ पोस्ट करत असतो. यासोबत आदित्य हा मार्शियल आर्टिस्टसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा असून इन्स्टाग्रामवरही त्याने बरेच फॉलोअर्स आहेत. 

रसिकाने मालिका मध्यातच सोडली होती आणि पुढील शिक्षणासाठी लॉस एंजिलिसला गेली होती. तेथे तिची आदित्यशी ओळख झाली आणि या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT