Rihanna esakal
मनोरंजन

VIDEO: अनंत अंबानी आणि राधिकाच्या 'प्री वेडिंग' फंक्शनमध्ये रिहानाचा जलवा; जबरदस्त परफॉर्मन्सची सर्वत्र चर्चा

Rihanna: अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कॉकटेल नाईटमध्ये बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली. यावेळी प्रसिद्ध गायिका रिहानानं (Rihanna) परफॉर्म केलं.

priyanka kulkarni

Rihanna: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्स सध्या जामनगरमध्ये (Jamnagar) सुरू आहेत. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. काल संध्याकाळी अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कॉकटेल नाईटमध्ये बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली. यावेळी प्रसिद्ध गायिका रिहानानं (Rihanna) परफॉर्म केलं. सध्या रिहानाच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पॉप गायिका रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स केला. रिहानाच्या परफॉर्मन्सनंतर अंबानी कुटुंब देखील स्टेजवर येऊन थिरकले. परफॉर्मन्सदरम्यान रिहाना म्हणाली, "आज इथे परफॉर्म करणे माझ्यासाठी खास आहे. याआधी मी कधीच भारतात आले नव्हते. अंबानी कुटुंबाचे आभार, त्यांच्यामुळे मी आज येथे आहे. अनंत आणि राधिका, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अभिनंदन."

पाहा व्हिडीओ:

रिहानाला शनिवारी सकाळी विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिनं पापाराझीसोबत फोटोसाठी पोज दिल्या. ती म्हणाली, “शो खूप छान झाला,”

रिहानानं प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी किती मानधन घेतलं?

इंस्टंट बॉलिवूड नावाच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यानुसार रिहानानं अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगसाठी तब्बल 52 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे, असं लिहिलेलं दिसलं.

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका यांचा विवाहसोहळा जुलैमध्ये पार पडणार आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांच्ये प्री वेडिंग फंक्शन्स जामनगरमध्ये होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT