Rocky Aur Rani Kii Prem Kahaani OTT Release  Esakal
मनोरंजन

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani ओटीटीवर रिलीज! जाणून घ्या केव्हा आणि कुठे येणार पाहता

Vaishali Patil

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani OTT Release: करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 335.70 कोटींचा व्यवसाय केला तर देशात दिडशे कोटींची कमाई केली आहे.

आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट OTT रिलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 21 सप्टेंबरच्या पासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम करण्यात येणार आहे. आता प्रेक्षक घर बसल्या हा चित्रपट Amazon Prime वर मोफत पाहू शकतात.

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ही एक प्रेमकथा आहे ज्यात भावनिक आणि कौटुंबिक ड्रामा पहायला मिळतो. त्याचबरोबर आलिया-रणवीरने पुन्हा एकदा रॉकी आणि राणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. 'गली बॉय'मधील त्यांची केमिस्ट्रीही खूप आवडली होती.

धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओ निर्मित आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. तर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

या चित्रपटाची स्टोरी दोन वेगळ्या विचारांचे लोक आणि दोन वेगळ्या कुटुंबाभोवती फिरते. यात रॉकी पंजाबी तर आलिया बंगाली परिवारातील आहे. जे लग्न करण्यासाठी आपले कुटूंब आपआपसात बदलतात. या चित्रपटात आलिया आणि रणवीरच्या प्रेमकहानीपेक्षा जास्त तर धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या लव्हस्टोरीची जास्त चर्चा रंगली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

Akole News: महिना उलटला तरी पुस्तकं मिळेनात! अकोलेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण समिती अध्यक्षांचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT