rohini hattangadi 
मनोरंजन

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रोहिणी हट्टंगडी हे नाव अख्ख्या चित्रपट सृष्टीला माहित आहे. हिंदी-मराठी फिल्म्स, सिरियल्स, नाटक या प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाची छाप त्यांनी सोडली आहे. आता त्यांना प्रथमच एका वेबसिरीज मध्ये पाहता येणार आहे. वननेस फिल्म्स निर्मित ‘रिलेशन कनेक्शन’ या वेबसिरीज मधील ‘आजीची पोतडी’ या लघुकथेत त्या दिसतील. आजकाल मोबाइल, सोशल मीडिया, व्हाट्सऍप च्या जमान्यात संवाद कुठे तरी हरवत चालला आहे आणि नक्की काय हरवत चाललं आहे हे या कथेमध्ये सहजतेने मात्र ठळकपणे मांडले आहे. 
 
रिलेशन म्हणजेच नातं. ते कोणासोबत सुद्धा असू शकतं, कोणतही असू शकतं. एखाद्या व्यक्तीशी, वस्तुशी, प्राण्याशी किंवा स्वतःशीही. कधी आपण प्रेमात पडतो, मैत्री निभावतो, कधी अनोळखी व्यक्ती अचानक आपलीशी वाटू लागते आणि कधी कधी तर एखादी निर्जीव वस्तू आपली सोबती होते. काही घटना, सुख दुःखाचे प्रसंग आपल्या आजूबाजूला, आपल्या सोबत घडतात. अशाच काही कथा वननेस फिल्म्स निर्मित रिलेशन कनेक्शन या वेबसीरिज मध्ये तुम्ही पाहू शकता. सारा श्रवण, तेजस्वी पाटील, नवीन प्रभाकर, रोहिणी हट्टंगडी यांसारखे अनेक मराठी कलाकार या वेबसीरिज मध्ये तुम्हाला पाहता येतील. वननेस फिल्म्स व समर्थ क्रिएशन्स निर्मित या लघुकथेचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी केले आहे. अभिनव पाठक हे “आजीची पोतडी” लघुकथेचे निर्माते आहेत. साध्या, सोप्या, हळुवार पण लोकांना भावणाऱ्या अशा कथा करायला मला नेहेमीच आवडत असे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी सांगितले.  
 
याआधी वननेस फिल्म्स निर्मित लघुपटांनी विविध फेस्टिवल्स मध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. या वेबसीरिजने आपले वेगळेपण जपले आहे. सरळसाध्या आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशाच कथा या वेबसीरिज मध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आजीची पोतड ही लघुकथा तुम्हाला वननेस फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेल वर १ ऑगस्टपासून पाहता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT