Singham Again: Esakal
मनोरंजन

Singham Again: सिंघम, सिम्बा, सूर्यवंशी तिन्ही एकत्र येणार! 'सिंघम अगेन'च्या शुटिंगचा झाला श्री गणेशा!

Vaishali Patil

गेल्या काही दिवसापासून रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची खुप चर्चा होती. सिंघम या चित्रपटाची एक वेगळी आणि तगडी फॅन फॉलोइंग आहे. रोहित शेट्टीने त्याच्या सिंघमचे आधीच 2 भाग आणले आहेत. आता त्यातच प्रेक्षक त्याच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच सिंघम अगेनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कॉप युनिव्हर्सने तयार केलेल्या 'सिंघम' आणि 'सिंघम 2' ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. रोहित शेट्टी पुन्हा एकदा अजय देवगणसोबत तीच जादू पुन्हा पसरवायला सज्ज झाला आहे.

'सिंघम अगेन' या चित्रपटातून अभिनेता आणि दिग्दर्शकाची जोडी पुन्हा एकदा आपल्या दमदार स्टाईलने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. नुकतच या चित्रपटाच्या शुटिंगचा श्री गणेशा झाला आहे.

रोहित शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेयर केली आहेत. ज्यात अजय देवगण आणि रणवीर सिंग दोघेही त्याच्या सोबत दिसताय. यासोबत रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या शुटिंगला नारळ फोडून सुरुवात केली आहे.

तर अक्षय कुमारने देखील हे फोटो पोस्ट करत तो देखील या चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच जॉईन करेल असं सांगितलं आहे.

अर्जुन कपूर हा अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटात एंट्री करणार असल्याच्या चर्चा आहे. तो या चित्रपटात पोलिस नव्हे तर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण देखील फीमेल लीडमध्ये दिसले अशा अनेक चर्चा आहेत मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रोहित शेट्टीच्या अॅक्शन फ्रँचायझीची सुरुवात 2011 मध्ये आलेल्या 'सिंघम' चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटाच्या यशानंतर 2014 मध्ये 'सिंघम रिटर्न्स' या नावाने त्याचा सीक्वल आला.

चित्रपट बाजीराव सिंघम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भुमिका साकरतो. तर आता अजय, रणवीर आणि अक्षय हा तिगडी काय कमाल करते याबाबत चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे.

चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT