Rubina Dilaik Meets With Car Accident, Husband Abhinav Shukla Provides health Update sakal
मनोरंजन

Rubina Dilaik Accident: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला अपघात.. नवऱ्यानं दिली हेल्थ अपडेट..

ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकच्या गाडीला मोठी धडक बसली आहे.

नीलेश अडसूळ

Rubina Dilaik Accident: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिन्दी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक हिचा अपघात झाला आहे. तिच्या गाडीला मोठी धडक बसली असून तिच्या पतीने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

या अपघता संदर्भात रुबिनाचा पती म्हणजेच अभिनेता अभिनव शुक्लाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या अपघताचा फोटो शेयर करत त्याने एक ट्विट केले आहे. तसेच रुबिनाच्या प्रकृतीचीही माहिती दिली आहे. शिवाय या अपघाता संदर्भात कारवाईची मागणी देखील अभिनव शुक्ला याने केली आहे.
(Rubina Dilaik Meets With Car Accident, Husband Abhinav Shukla Provides health Update)

विशेष म्हणजे या अपघतात रुबिनाला कोणीतही इजा झालेली नाही. अभिनवने रुबीनाची प्रकृती ठीक असल्याचेही सांगितले आहे. मात्र रुबिनाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असल्याने तिच्या अपघताच्या बाटमिने तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

अभिनव शुक्लाने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये अपघत झाल्यानंतरचे गाडीचे फोटो शेयर केले आहेत. सोबत लिहिले आहे की, 'जे आमच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. फोनवर बोलत ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. याबाबत सविस्तर माहिती मी देईनच..'

'या अपघतावेळी रुबिना गाडीतच होती, पण सध्या ती ठीक आहे. तिला उपचारांसाठी डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो. पण माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, या अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करावी.'

अभिनवच्या या ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी लिहिले की, 'ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलिस स्टेशनला या अपघाताची माहिती द्या'

रुबिना दिलैक ही टीव्ही जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'छोटी बहु' या मालिकेद्वारे अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. याशिवाय तिने 'बिग बॉसच्या १४' जिंकलं होतं. तसेच 'खतरों के खिलाड़ी 12', 'झलक दिख लाजा' मध्ये देखील ती सहभागी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT