rutuja bagwe  
मनोरंजन

थोडक्यात वाचले नाहीतर माझा चेहरा.. ऋतुजा बागवेचा अपघात..

नाटक आणि मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे जखमी झाली आहे. स्वयंपाक करताना गरम..

नीलेश अडसूळ

अनेक लोकप्रिय मालिका आणि अनन्या या नाटकातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री ऋतुजा बागवेबाबत काळजी करण्याची बातमी समोर आली आहे. ऋतुजाच्या ‘नांदा सौख्य भरे’, ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिका विशेष गाजल्या. अभिनेत्री ऋतुजा बागवे आपल्या चाहत्यांशी चांगलीच संपर्कात असते. त्यासाठी सोशल मीडियावर तिचा वावर बराच सक्रिय असतो. तिचा योगा, डान्स, रिल्स याच्या अनेक व्हडिओ ती रोज पोस्ट करत असते. गेल्या काही दिवसात तिने शेअर केलेल्या व्हिडिओत तिला अंगावर जखमा झाल्याचे दिसत होते.

त्याबाबत ऋतुजाने (rutuja bagwe) खुलासा केला आहे. स्वयंपाक करताना भाजले असल्याचे ऋतुजाने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ऋतुजा म्हणाली की, “मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतो. त्यादिवशी मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काहीतरी पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरचा वापर करत होते.मी सवयीप्रमाणे मिक्सर सुरु केला. पण अचानक त्या भांड्यातील गरम द्रवपदार्थ माझ्या हातावर आणि मानेवर उडाला. सुदैवाने माझ्या चेहऱ्यावर ते उडलं नाही पण हातावर आणि मानेवर मात्र भाजलं. हे घडलं तेव्हा क्षणासाठी मी प्रचंड घाबरले होते. कारण कोणत्याही अभिनेत्रीसाठी तिचा चेहरा हा खूप महत्त्वाचा असतो.” (rutuja bagwe upperbody burn in kitchen)

'अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी माझा चेहरा खूप महत्वाचा आहे.त्यामुळे यापुढे पूर्ण काळजी घेऊन आणि सावधगिरीने स्वंयपाकघरात वावरेन. या घटनेने मला चांगलाच धडा दिला आहे. सध्या वेळेवर औषधे घेणे, योग्य आहार घेणे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी राहणे याला मी प्राधान्य देत आहे,' असेही ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Crime : वारजे, मुंढवा परिसरात हातभट्टी अड्ड्यांवर छापे; विषारी रसायनांचा साठा जप्त

Latest Marathi News Live Update: सगळ्यांना जोडणारं तत्त्व केवळ भारताकडे- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT