Rutuja Bagwe and Vishal Phale 
मनोरंजन

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विशाल फालेसोबत ऋतुजा बागवेचा रोमान्स

पहा व्हिडीओ

स्वाती वेमूल

लग्नाआधीच्या बऱ्याच लव्हस्टोरी आपण पहिल्या आहेत, काहींनी तर अनुभवल्या देखील आहेत. मात्र लग्नानंतरची पती-पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी नेमकी कशी असेल बरं, याचं साजेसं उत्तर घेऊन 'जीव रंगलया' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट' प्रस्तुत या गाण्याची निर्मिती 'सेवन सिझ मोशन पिक्चर'ने केली आहे. या गाण्यात अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि विशाल फाले (Vishal Phale) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विशाल फाले 'प्रिन्स ऑफ मुळशी' या नावाने खूपच प्रसिद्ध आहे. विशालचे सोशल मीडियावर दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या या गाण्याचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यात ऋतुजा आणि विशालचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहेत. या गाण्याच्या टिझरलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

'जीव रंगलया' गाण्याच्या पोस्टरमध्ये या दोघांची जोडी अगदी खुलून दिसत असून बहरत जाणाऱ्या प्रेमाची गोडी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. या गाण्यात पती पत्नीचा लग्नानंतरचा रोमान्स, त्यांची जवळीक यांचे खूप सुंदर वर्णन पाहायला मिळणार आहे. ओंकार माने दिग्दर्शित हे गाणे असून गाण्याचे बोल आणि गाण्याच्या निर्मितीत समीर परब यांचा खारीचा वाटा आहे. ओंकारने आजपर्यंत २० गाणी दिग्दर्शित केली आहेत. या रोमँटिक गाण्याला संगीत प्रितेश कामत यांनी दिले असून गायक भूषण गोसावी यांनी हे गाणं आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केले आहे. या गाण्याच्या छायाचित्रणाची जबाबदारी शशिकांत सिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली.

'जीव रंगलया' या गाण्याच्या पोस्टरने गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. शिवाय या गाण्यात एका नव्या अंदाजात ऋतुजा आणि विशालला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

SCROLL FOR NEXT