Sakal Premier Award 2023 in Thane today 
मनोरंजन

Sakal Premier Award 2023 : ठाण्यात आज ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’

तारे-तारकांच्या उपस्थितीत मनोरंजन क्षेत्रातील कलागुणांचा होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा

Sakal Premier Award 2023 : मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील तारे-तारकांची मांदियाळी, नृत्याचा बहुरंगी आविष्कार, जोडीला विनोदाची झणझणीत फोडणी आणि खुमासदार सूत्रसंचालन अशा दिमाखदार वातावरणात बुधवारी (ता. १२) ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ रंगणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदींसह राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. पीएनजी ज्वेलर्स लि. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

मुंबई आणि पुण्यात अनुक्रमे पहिला व दुसरा ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ दिमाखात पार पडला होता. आता तिसरा प्रीमियर पुरस्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. पूजा सावंत, मानसी नाईक, नेहा महाजन, रोहित शिवलकर, अमिता कुलकर्णी, स्वामिनी वाडकर आणि पुष्कर जोग हे कलाकार दमदार नृत्याविष्कारांनी सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत.

अभिनेते संजय मोने चटकदार विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. यंदाच्या सोहळ्यात एकापेक्षा एक सरस विविध चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट गीतकार आणि सर्वोत्कृष्ट संकलक इत्यादी पुरस्कारांबरोबरच काही मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्रच ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’ची चर्चा रंगू लागली असून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विजेत्यांबाबत उत्सुकता

वाळवी, मी वसंतराव, चंद्रमुखी, गोष्ट एका पैठणीची, सरसेनापती हंबीरराव, बालभारती आणि धर्मवीर चित्रपटांमध्ये प्रीमियर पुरस्कारासाठी मोठी चुरस आहे. स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, अजय पुरकर आणि ललित प्रभाकर यांच्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी स्पर्धा होणार आहे.

सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, मुक्ता बर्वे, जिनिलिया देशमुख आणि पूर्वा पवार यांची नावे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या पुरस्कारांच्या स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी प्रवीण तरडे, परेश मोकाशी, शंतनू रोडे, निपुण धर्माधिकारी आणि अजित वाडीकर यांची नावे आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT