Salaar Full Movie Leaked Online   Esakal
मनोरंजन

Salaar Movie Leaked Online: 'सालार'ला पहिल्याच दिवशी बसला पायरसीचा फटका! 'या' साईटवर झाला ऑनलाइन लीक...

प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला आहे.

Vaishali Patil

Salaar Full Movie Leaked Online: साउथ सुपरस्टार प्रभासच्या 'सालार : पार्ट 1 सीझफायर' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. प्रभासचे चाहते या सिनेमाची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर ( 22 डिसेंबर) सला हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल झाला आहे.

पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. 'सालार'ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मात्र आता या सालार संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे निर्माते आणि कलाकार अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे.

प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला आहे. तो देखील फुल HD मध्ये. त्यामुळे आता सालारच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सालार' MovieRules, FilmyZilla, TamilRockers, Telegram आणि 123Movies सारख्या अनेक साइटवर उपलब्ध आहे. नेटकरी HD प्रिंटमध्ये हा सिनेमा डाउनलोड करत आहेत.

चित्रपट फ्रीमध्ये उपलब्ध असल्याने चित्रपटगृहात जाऊन तिकीट खरेदी करण्याऐवजी प्रेक्षक घरबसल्या फ्रीमध्ये चित्रपट पाहत आहेत. त्यामुळे नक्कीच या चित्रपटाच्या कमाईवर आता परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

याआधी 'डंकी', 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे चित्रपटही ऑनलाइन लीक झाले आहेत. प्रभासच्या सालार बद्दल बोलायचे झाले तर प्रशांत नील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

'सालार'मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगत्पती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर डंकी आणि सालारची थेट स्पर्धा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT