Bigg Boss 16 Latest News Bigg Boss 16 Latest News
मनोरंजन

BB 16 : पहिल्या स्पर्धकाची घोषणा करताच सलमान खानने दिला इशारा; म्हणाला, मर्यादा...

आतापर्यंतच्या सीझनमध्ये असे अनेक स्पर्धक आले ज्यांनी मर्यादा ओलांडली

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 Latest News टीव्हीचा सर्वांत वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस १६ ची पत्रकार परिषद मंगळवारी झाली. १२ वर्षांपासून सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करीत आहे. सलमान खानने शोमधील पहिल्या स्पर्धकाची ओळख करून दिली. पहिला स्पर्धक दुसरा कोणी नसून दुबईचा गायक अब्दु रोजिक आहे. तसेच घरात येण्यापूर्वीच शोचा होस्ट सलमान खानने स्पर्धकांना सावध केले आहे.

स्पर्धक ज्या पद्धतीने वागतात त्यामुळे खूप राग येतो. कधीकधी ते मर्यादा ओलांडतात. यामुळे मला वाईट वाटते. तुम्ही लोक तासभर शो पहता त्यातही हे लोक मर्यादा ओलांडतात. कधीकधी हे लोक खूप जास्त बोलतात. या लोकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धकांसाठी सीमा ठरवणे आवश्यक आहे, असेही सलमान खान पत्रकार परिषदेत म्हणाला.

आतापर्यंतच्या सीझनमध्ये असे अनेक स्पर्धक आले ज्यांनी मर्यादा ओलांडली आहे. अशा स्पर्धकांना सलमान खानने ‘वीकेंड का वार’मध्ये कठोर शिक्षा केली आहे. स्वामी ओम, प्रियांका जग्गा, विकास गुप्ता, डॉली बिंद्रा, मधुरिमा तुलीप्रियांक शर्मा, झुबेर खान यांना तर सलमान खानने बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यावेळी सलमान खानने (Salman Khan) स्पर्धकांना सावध केले आहे.

पहिला स्पर्धक अब्दु रोजिक

अब्दु रोजिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान स्वतः त्याच्यासोबत स्टेजवर येतो. तसेच अब्दुची ओळख करून देतो. अब्दु रोजिक मंचावर हटक्या शैलीत येतो. ‘अब्दू थेट बिग बॉसच्या घरात जात आहे’ असे सलमान खान म्हणतो. अब्दु रोजिकचे चाहते खूप उत्सुक आहेत. अब्दु रोजिक ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Crime News: हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना; गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने घेतला गळफास

Diesel Supply Crisis : डिझेल टंचाईचे संकट गडद; दिवाळीनंतर दरवाढीची शक्यता, महागाईची आणखी झळ बसण्याची भीती

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Pune Bengaluru Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! हिरेबागेवाडी ते हालगा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू; ऊस दराच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT