salman khan birthday celebration bobby deol kiss salman khan SAKAL
मनोरंजन

Salman Khan Birthday: भाईचा बर्थडे! सलमानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, लॉर्ड बॉबीच्या खास अंदाजात शुभेच्छा

भाईजानच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलंय

Devendra Jadhav

Salman Khan Birthday Celebration: सुपरस्टार सलमान खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्यावर कुटुंबीय, चाहते आणि बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हा दिवस आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे, सलमान खानने त्याचा वाढदिवस त्याची बहीण अर्पिता खान शर्माची मुलगी आयतसोबत शेअर केला. काल रात्री सलमान खानने त्याची भाची, मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं.

सलमानने भाचीसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला

सलमान खानने भाची आयतसोबत केक कापून आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बॉलीवूडचा भाईजान त्याचा वाढदिवस जवळच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा करताना दिसत आहे.

लॉर्ड बॉबीने सलमान खानला केलं किस

'अ‍ॅनिमल' अभिनेता बॉबी देओलनेही सलमान खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एका फोटोमध्ये बॉबी देओल बर्थडे बॉयच्या गालावर किस करताना दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत बॉबी सलमानच्या खांद्यावर हात ठेवून कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना बॉबी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मामू मी तुझ्यावर प्रेम करतो."

सलमानच्या वाढदिवसाला सेलिब्रिटींची उपस्थिती

सलमान वाढदिवसाच्या पार्टीत लुलिया वंतूर, अरबाज खान, अरहान खान, हेलन, अलविरा खान अग्निहोत्री, आयुष शर्मा, अर्पिता खान शर्मा, बॉबी देओल यांच्यासह संगीतकार साजिद, फॅशन डिझायनर नंदिता महतानी आणि इतर अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

या सर्वांनी सलमान खानसोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी, सलमान त्याचा भाऊ अरबाज खान आणि शुरा यांच्या लग्नात स्पॉट झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT