Salman khan Latest News Salman khan Latest News
मनोरंजन

BB 16 : १,००० कोटींवर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, इतके पैसे मिळाले तर...

सलमानचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले

सकाळ डिजिटल टीम

Salman khan Latest News सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा बिग बॉसच्या (Bigg Boss 16) नव्या सीझनमुळे चर्चेत आहे. या शोची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी शोची पत्रकार परिषद झाली. जिथे सलमानने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरवर्षी सलमानची फी चर्चेत असते. सलमानने यंदाच्या सीझनसाठी १,००० कोटी घेतल्याच्या बातम्या आल्या. सलमानला याबाबत विचारले असता बातमी चुकीची असल्याचे सांगितले. सलमानने यावर दिलेले उत्तर मजेशीर आहे.

‘इतके पैसे मिळाले तर मी आयुष्यात कधीच काम करणार नाही. त्याचा एक चतुर्थांशही मिळाले नाही. माझा खर्चही खूप आहेत. मला वकिलांनाही पैसे द्यावे लागते. वकीलही सलमान खान आहे. सलमान खान इथून घेतो, सलमान खान तिकडे घेऊन जातो’ असा सलमान खान (Salman Khan) म्हणाला.

‘१,००० कोटींच्या फीबद्दल ऐकल्यानंतर आयकराचे लोक माझ्या घरी आले आणि चेक केले. नंतर त्यांना सत्य कळले की माझ्याजवळ काय आहे’ असेही सलमान खान म्हणाला. सलमानचे हे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले.

बिग बॉस १६ (Bigg Boss 16) होस्ट करणार नसल्याच्या अफवांवर सलमानने प्रतिक्रिया दिली. ‘कधीकधी विचार करतो की आता शो करणार नाही. परंतु, हे लोक मला घेतात. मी नाही तर कोण करणार? त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही’ असेही सलमान खान म्हणाला. यावेळी शोचा वीकेंड शुक्रवार आणि शनिवार राहील. पूर्वी फक्त शनिवार आणि रविवारी वीकेंडचे युद्ध व्हायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT