salman khan tiger 3 grand welcome in odisha maharaja picture palace theatre bhubaneswar SAKAL
मनोरंजन

Tiger 3: सलमानच्या टायगर 3 चं ओडिशात जंगी स्वागत, फॅन्सनी थिएटरबाहेर केला जल्लोष, व्हिडीओ बघा

सलमान खानच्या टायगर 3 जं ओडिशात जंगी स्वागत करण्यात आलंय, व्हिडीओ बघा

Devendra Jadhav

Tiger 3 Grand Welcome: सलमान खानचा टायगर 3 आज सगळीकडे रिलीज झालाय. टायगर 3 पाहण्यासाठी प्रेक्षक सकाळपासुनच सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत.

सलमान खान - कतरिना कैफ - इमरान हाश्मीचा टायगर 3 बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी करेल यात शंका नाही. दरम्यान आज भल्या पहाटे मॉर्निंग शोला टायगर 3 चं ओडिशात जंगी स्वागत करण्यात आलं असुन व्हिडीओ व्हायरल झालाय.

टायगर 3 विषयी एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ओडिशातील भुवनेश्वर भागातील महाराजा पिक्चर पॅलेस थिएटर दिसतं. या थिएटरबाहेर सलमान खानच्या फॅन्सनी एकच जल्लोष केलाय.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की सलमानच्या टायगर 3 चे मोठे कटआऊट्स लावलेले पाहायला मिळत आहेत. याशिवाय फॅन्सनी टायगर सारखी वेशभुषा केली असुन रुमाल गुंडाळला आहे. थिएटरबाहेर नाचत सलमानच्या फॅन्सनी टायगर 3 चं जंगी स्वागत केलेलं पाहायला मिळतं.

'टायगर 3' चित्रपटाच्या अ‍ॅडवान्स बुकींगला देखील प्रेक्षकांचा खुप प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा पहिल्याच दिवशी 30-40 कोटी रुपयांची धमाकेदार ओपनिंग देणार अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडे भाईजान आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना वेगळी चिंता लागली आहे.

'टायगर 3' च्या रिलीजपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफने 'टायगर 3' संदर्भात चाहत्यांना एक विनंती केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 'टायगर 3'चे स्पॉयलर शेअर न करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केलं आहे.


यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसणार आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT