Samantha Ruth Prabu in Us is not for skin treatment but for another good reason..here we know... Instagram
मनोरंजन

Samantha ठणठणीत! अभिनेत्री वेगळ्याच कारणासाठी पोहोचलीय अमेरिकेत

समंथाला त्वचेचा गंभीर आजार झालाय आणि त्याच्यावरील उपचारांसाठी ती शूटिंग तातडीनं थांबवून अमेरिकेत गेल्याची अफवा दोन दिवसांपूर्वी पसरली होती.

प्रणाली मोरे

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या भलतीच चर्चेत आहे. गेल्या १४ दिवसांपासून तिनं जणू काही जगापासून स्वतःला लांब ठेवलं आहे. कोणी बोलत होतं की तिला त्वचेचा आजार झाला आहे तर कोणी बोलत होतं की त्वचेच्या गंभीर आजारावर औषधोपचार करण्यासाठी ती परदेशात गेली आहे. डॉक्टरांनी तिला लोकांपासून दूर राहण्याचा,गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि म्हणूनच तिनं विजय देवरकोंडासोबतच्या 'खुशी' सिनेमाचं शूटिंगही पुढे ढकललं आहे,अगदी असं देखील बोललं जात होतं.

आता या सगळ्या अफवांच्या दरम्यान समंथाच्या मॅनेजरने समोर येऊन सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मॅनेजरनं म्हलंय की, ''समंथाविषयी ज्या काही बातम्या उठल्या आहेत,त्यात काहीच तथ्य नाही,निव्वळ अफवा आहेत''. आणि आता समंथाविषयी एक बातमी कानावर पडतेय ज्यामुळे चाहते मात्र खूश होणार आहेत.(Samantha Ruth Prabu in Us is not for skin treatment but for another good reason..here we know...)

समंथा रुथ प्रभू सध्या अमेरिकेत आहेत. ती आपली आगामी वेबसीरिज 'सिटाडेल' साठी अमेरिकेत गेलीय.तिच्या जवळच्या सूत्रांकडून कळत आहे की,समंथा अमेरिकेत 'सिटाडेल' मधील आपल्या व्यक्तिरेखेची तयारी करण्यासाठी गेली आहे. या सीरिजमध्ये आपल्या व्यक्तीरेखेला शोभेल अशी फिटनेस बनवण्यात सध्या ती तिकडे व्यस्त आहे. ती यासाठी एकदम शिस्तीचं लाइफस्टाईल तिकडे फॉलो करत आहे असंही सांगितलं जातंय. अमेरिकेत ती अॅक्शन मध्ये एक्सपर्ट असलेल्या ट्रेनर्सकडून ट्रेनिंग घेत आहे.

'सिटाडेल' Sci-Fi सीरिज 'सिटाडेल' चं स्पिन-ऑफ आहे. इंडियन स्पिन-ऑफला राज अॅन्ड डीके बनवणार आहेत. ही प्रियंका चोप्रा आणि रिचर्ड मेडन अभिनित एक मोठ्या बजेटची Sci-Fi सीरिज आहे,ज्याला रुसो ब्रदर्सने दिग्दर्शित केलं आहे.

समंथा रुथ प्रभू 'सिटाडेल' मध्ये वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दोघं पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. समंथाच्या या नवीन सिरीजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

याआधी समंथा हिंदी वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' मध्ये मनोज वाजपेयीसोबत दिसली होती. ही सीरिज सगळ्यांनाच आवडली होती. आता 'द फॅमिली मॅन ३' ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

समंथा रुथ प्रभु सिटाडेल व्यतिरिक्त 'शाकुंतलम' मध्ये देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर रिलीज केला गेला. यामध्ये देव मोहन लीड रोल मध्ये आहे. हा सिनेमा ४ नोव्हेंबर,२०२२ रोजी हिंदी,तेलुगू,तामिळ,मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जगभरात रीलिज केला जाणार आहे.

समंथा रुथ प्रभूला अखेरचं करण जोहरच्या कॉफी विथ करण चॅट शो मध्ये आपण पाहिलं होतं. ती त्या भागात अक्षय कुमारसोबत आली होती. त्यावेळी तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT