sanjana  
मनोरंजन

Video Viral: 'आई कुठे काय करते'च्या संजनाचं लग्न?

बिग बॉ़स मराठीमध्ये वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री ((Marathi Actress) म्हणून रुपाली भोसलेचं नाव घेता येईल.

सकाळ डिजिटल टीम

Sanjana News: बिग बॉ़स मराठीमध्ये वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री (Marathi Actress) म्हणून रुपाली भोसलेचं नाव घेता येईल. ती सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत (Viral Video) आली आहे. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून रुपालीचं नाव घेतलं जातं. आई कुठे काय करते या मालिकेतून तिच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली आहे. सोशल मीडियातून चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून रुपालीचं लग्न झाल्याची चर्चा व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं रुपालीच्या चाहत्यांच्या चर्चेचा आणखी एक विषय मिळाला आहे. Aai Kuthe Kay Karte News

आई कुठे काय करते मध्ये रुपालीनं संजनाची भूमिका साकारली आहे. रुपालीनं या मालिकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली अन तिच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावत गेल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तिने चक्क लग्न केल्याचं दिसून आलं आहे. त्यावरुन तिनं लग्न केलं. अशी चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावरुन तर नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्यक्षात तिचा तो व्हिडिओ एका गाण्याच्या प्रमोशनचा आहे. या व्हिडिओमध्ये ती नववधूच्या वेशात दिसत असून तिच्यासोबत नवरदेवाच्या रुपात आणखी एक मुलगा उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. रुपालीचं 'नाते नवेसे' हे नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ते सागरिका म्युझिकनं निर्मित केलं आहे. ते आता युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनचा एक भाग तिनं सेटवरील नववधूच्या वेशातील व्हिडीओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi custody : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपर्यंत मुंबई पोलीस का पोहोचू शकत नाहीत?; 'साबरमती'तून ताब्यात घेण्यास बंदी का?

Mumbai Local: मुंबईकरांनो लोकलचा लेटमार्क विसरा, आता ताशी १०० किमी वेगाने गाड्या धावणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: पुणे शिक्षक मतदारसंघात पदवीधरांपेक्षा अधिक मतदान; दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर

karnataka Politics : ''मेटा स्मार्ट ग्लास घालून माझं स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न'', मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Delhi Protests: सरकारला 'सीजेपी'चा धसका! आंदोलन पुन्हा पेटणार? गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT