shanaya kapoor 
मनोरंजन

कपूर खानदानातील आता 'या' स्टारकिडची होणार बॉलीवूडमध्ये एंट्री

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सध्या स्टारकिड्स सोशल मिडियावर अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. मात्र अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की कपूर खानदानातील 'या' स्टारकिडचं लवकरंच बॉलीवूडमध्ये पदार्पण होणार आहे. आता तिच्या वडिलांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बॉलीवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर स्टारकिड्समुळे आधीच चर्चेत आहे. मात्र अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की संजय कपूरची मुलगी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याच चर्चांना पूर्णविराम देत अभिनेता संजय कपूरने मुलगी शनाया लवकरच बॉलीवूड डेब्यु करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

अभिनेता संजय कपूरने एका प्रसिद्ध वाहिनीशी बोलताना सांगितलं की 'शनाया कपूरच्या बॉलीवूड पदार्पणाला कोरोनाच्या संकटामुळे उशीर झाला आहे. मात्र मला आशा आहे की हे सगळं लवकरच व्यवस्थित होईल. ' असं म्हणत त्याने अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शनाया कपूर बॉलीवूडमध्ये लवकरंच पदार्पण करणार ही तिच्या चाहत्यांसाठी खुशखबरंच आहे. तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

नेहमीच सोशल मिडियावर तिच्या अदांमुळे चर्चेत असणारी आणि चाहत्यांना तिच्या ग्लॅमरमुळे प्रेमात पाडणारी शनाया मोठ्या पडद्यावर काय जादू करणार हेच पाहायचंय. इतकंच नाही तर तिचे चाहते ती कोणत्या सिनेमातून आणि कोणासोबत डेब्यु करणार हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत.

शनाया भलेही मोठ्या पडद्यावर दिसून आली नसली तरी तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. शनाया कपूरने नुकताच रिलीज झालेल्या 'गुंजन सक्सेना:द कारगिल गर्ल' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली होती. तेव्हा आता तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.   

sanjay kapoor daughter shanaya kapoor bollywood debut to happen soon 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT