Sanya Malhotra  Instagram/Sanya Malhotra
मनोरंजन

'या' कारणामुळे झालं 'दंगल गर्ल'चं ब्रेकअप

सान्या पहिल्यांदाच रिलेशनशिपबद्दल झाली व्यक्त

स्वाती वेमूल

'दंगल' या चित्रपटात दमदार भूमिका साकारत अभिनेत्री सान्या मल्होत्रा Sanya Malhotra हिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सान्याने त्यानंतर इतरही काही चित्रपटांमधून आपल्या अभिनयकौशल्यची चुणूक दाखवली. सान्याच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांना फार कमी माहित आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पहिल्यांदाच तिच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपविषयी व्यक्त झाली. गेल्या वर्षी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा सान्याने केला आणि त्याचसोबत ब्रेकअप का झालं, तेसुद्धा तिने सांगितलं.

'ब्राइट्स टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सान्या म्हणाली, "ब्रेकअपमुळे मी फार खचले होते. मी दिल्लीत राहत असताना त्या मुलाला डेट करू लागले. चार वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. ब्रेकअपनंतर लॉकडाउन सुरू झाला आणि मी मुंबईत एकटी राहू लागले. या एकटेपणात मी स्वत:विषयी आणि रिलेशनशिपविषयी खूप विचार करू लागले. मला माझ्या स्वभावातही बदल आणावं लागेल, असं वाटू लागलं."

"माझं रिलेशनशिप परफेक्ट होतं. मिनाक्षी सुंदरेश्वर या माझ्या चित्रपटातही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपचा विषय होता. म्हणून मी माझ्या मुलाखतींमध्ये त्याच्याविषयी बोलणार होते. त्यासाठी त्याने परवानगीसुद्धा दिली होती. कारण पहिल्यांदाच मी असं सर्वांसमोर माझ्या रिलेशनशिपबद्दल बोलणार होते. माझ्या मते, लाँग डिस्टन्समुळेच आमचं नातं फार काळ टिकलं नाही", असं ती पुढे म्हणाली.

सान्या मुंबईत एकटी राहत असल्याने तिला अशी एखादी व्यक्ती हवी होती जिच्यासोबत ती राहू शकेल आणि चांगला वेळ घालवू शकेल, जे तिच्या लांबच्या नातेसंबंधात शक्य नव्हतं. यावर्षी सान्याचे दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. 'पगलाइट' आणि 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या. ती लवकरच 'लव्ह हॉस्टेल', 'हिट' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT