Devmanus 
मनोरंजन

अंत नव्हे नवी सुरुवात; 'देवमाणूस'चा दुसरा सिझन येणार?

मालिकेच्या निर्मात्यांनी दिले संकेत

स्वाती वेमूल

झी मराठी Zee Marathi वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus या लोकप्रिय मालिकेने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यादिवशी मालिकेचा दोन तासांचा महाएपिसोड प्रसारित करण्यात आला होता. या महाएपिसोडमध्ये कथेचा शेवट होईल, असा अंदाज प्रेक्षकांना होता. मात्र कथेचा शेवट निर्मात्यांनी दाखवला नाही. उलट या कथानकामुळे आता मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होत आहे. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाडने Kiran Gaikwad मुख्य भूमिका साकारली आहे.

कथेचा अंत झाला नाही

गावाबाहेर लागलेल्या आगीत चंदाचा मृतदेह गावकऱ्यांना दिसतो. त्याजवळच डॉक्टरचा चष्मा, पेन आणि घड्याळ दिसतं. यावरून डॉक्टरचाही आगीत अंत झाला, असा अंदाज गावकरी लावतात. दुसरीकडे वाड्यात हळूहळू गोष्टी पूर्ववत होत आहेत. एके रात्री सर्वजण झोपले असताना डिंपल हळूच आपली बॅग उचलून बाहेर पडते. हॉस्पिटलमध्ये एक माणूस अखेरचा श्वास घेतो आणि डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. डॉक्टर बाहेर जाताच तो माणूस पुन्हा जिवंत होतो. हा माणूस दुसरा, तिसरा कोणी नसून, देवीसिंग असतो. कथानकाच्या या शेवटामुळे दुसऱ्या सिझनची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मालिकेच्या निर्मात्यांनी दिले संकेत

मालिकेची निर्माती श्वेता शिंदे हीने अभिनेता किरण गायकवाडसोबतचे काही फोटो पोस्ट करत एक पोस्ट लिहिली आहे. '१६ ऑगस्ट २०२० ला ऐन पॅन्डामिकमध्ये वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक वर्ष सरलं. रात्री १०:३० च्या स्लॉटला असूनसुद्धा सर्व मराठी मालिकांमध्ये नंबर वन राहण्याचा इतिहास या मालिकेने रचला, ते केवळ मालिकेवर असीम प्रेम करणाऱ्या आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे. 'लागिर झालं जी'मधील भैय्यासाहेब असो वा 'देवमाणूस'मधील देवीसिंग उर्फ अजित कुमार देव.. किरण तू नेहमीच माझ्या विश्वासाला पात्र ठरत प्रत्येक भूमिका अगदी उत्तम साकारलीस. सरू आजी आणि टोन्यामुळे तर जणू मीम्सची बरसातच झाली', असं लिहित तिने सर्वांचे आभार मानले. तर लवकरच आणखी काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू, पण तोपर्यंत तुमचं असंच प्रेम आमच्या पाठीशी राहु द्या, असं तिने पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे. त्यामुळे निर्मात्यांनीही दुसऱ्या सिझनचे संकेत दिल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT