vamika gifts 
मनोरंजन

शाहरुखपासून दीपिकापर्यंत.. अनुष्काच्या वामिकासाठी सेलिब्रिटींनी पाठवले 'हे' महागडे गिफ्ट्स

स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. पती विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. विराट-अनुष्काच्या घरी लहान पाहुणीचं आगमन होताच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी भेटवस्तू पाठवल्या. 'विरुष्का'च्या वामिकाला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची सध्या जोरदार चर्चा आहे. 

अनुष्काने किंग खान शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अनुष्का मुलगी झाल्याचे कळताच शाहरुखने बाहुल्यांचं मोठं घर भेटवस्तू म्हणून पाठवलं. 'न्यूज नेशन'ने दिलेल्या माहितीनुसार, या बाहुलीघराची किंमत जवळपास ७० हजार रुपये इतकी आहे. तर दीपिका पदुकोणने जवळपास एक लाख ८० हजार रुपयांची सोन्याची चैन भेट म्हणून पाठवली. 

शाहरुखप्रमाणेच सलमाननेदेखील वामिकासाठी बाहुल्यांचं घर खरेदी केलं असून त्याची किंमत जवळपास एक लाख रुपये असल्याचं म्हटलं जातंय. ऐश्वर्या राय बच्चनने अनुष्कासाठी महागड्या चॉकलेट्सचा बॉक्स पाठवला. ऐश्वर्या आणि अनुष्काने 'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तर बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षय कुमारने वामिकासाठी सोन्याचे पैजण भेट म्हणून पाठवले. आमिर खानने जवळपास १ लाख ७० हजार रुपयांचा पाळणा वामिकासाठी दिला. 

११ जानेवारी रोजी मुलीच्या जन्मानंतर विराट व अनुष्काने वामिकासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर १ फेब्रुवारी रोजी पोस्ट केला. याचवेळी दोघांनी मुलीचं नाव जाहीर केलं. 'वामिका' असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिताच सोशल मीडियावर हे नाव ट्रेण्ड होऊ लागलं. वामिका हे देवी दुर्गेचं एक नाव आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीत मोठी घसरण! सलग पाचव्या दिवशी सोनं स्वस्त; आजचा भाव किती?

PMC Decision: पुणे महापालिकेचा निर्णय! महिलांना करात ५० टक्के सवलत, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मिळणार लाभ, काय आहेत अटी व शर्ती?

Latest Marathi News Live : शहादाच्या प्रकाशा येथे अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांवर कारवाई

Ration Scam : ठराविक रेशन दुकानदारांना जास्तीचे धान्य; कोट्यवधींचा अपहार, दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

लग्न करुनही जॅकी-रकुल 'सिच्युएशनशिप'मध्ये! अभिनेता म्हणाला...'मी बायकोपासून एक्स गर्लफ्रेंडचा...'

SCROLL FOR NEXT