Shah Rukh Khan Jawan Movie Sequel Director Atlee  esakal
मनोरंजन

Jawan Sequel : 'जवान'चा सिक्वेल येणार पण त्यात....! दिग्दर्शक अ‍ॅटलीनं सांगितली मोठी गोष्ट!

आता जवाननं पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करायचे असे ठरवल्याचे दिसून आले आहे. त्यात किंग खाननं आतापर्यत सातशे कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Jawan Movie Sequel Director Atlee : दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली हा बॉलीवूडच्या चाहत्यांना माहिती नव्हता असे नाही. त्याच्या अनेक कलाकृतींमुळे तो कमालीचा लोकप्रिय झाला होता. मात्र जेव्हा त्यानं किंग खान शाहरुखसोबत जवान केला आणि तो हिट झाला. आता अॅटली सगळ्यांनाच माहिती झाला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी किंग खानचा शाहरुखचा जवान हा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला होता. पठाणनंतर शाहरुखचा हा दुसरा प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानं देखील हजार कोटींची कमाई केली होती. भलेही त्यावरुन वाद झाला होता, पण त्यानं विक्रमी कमाई केली.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

आता जवाननं पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करायचे असे ठरवल्याचे दिसून आले आहे. त्यात किंग खाननं आतापर्यत सातशे कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच अॅटलीनं पुन्हा एकदा मोठी बातमी देऊन नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती बातमी आहे जवानच्या सिक्वेलची. आपण जवानचा दुसरा भाग तयार करणार आहोत असेही अॅटलीनं सांगताना काही गोष्टींविषयी भाष्य केले आहे.

७ सप्टेंबर रोजी अॅटलीचा जवान हा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाल्याचे दिसून आले. त्यानं आतापर्यत ७५० कोटींची कमाई केली आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या एका बातमीनुसार, अॅटलीनं जवानचा सिक्वेल येणार असल्याचे म्हटले आहे. त्यात त्यानं अद्याप तारखेचा कोणताही उल्लेख केलेला नाही. येत्या वर्षात शाहरुखचा डंकी नावाचा चित्रपट येणार असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

खरं सांगतो प्रेक्षकांच्या अतीव प्रेमामुळे मी जवानचा दुसरा भाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. विक्रम राठोडसोबतच पुढचा भाग करणार आहे. त्याला सोडून काहीही करता येणार नाही. त्याच्याशिवाय ती गोष्ट शक्यच नाही. किंग खाननं जवानमध्ये विक्रमसिंग राठोड या आर्मी जवानाची भूमिका साकारली होती.

शाहरुखबरोबरच या चित्रपटामध्ये नयनतारा, विजय सेतुपति, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणि, सुनील ग्रोव्हर, गिरिजा ओक, आलिया कुरेशी, संजीता भट्टाचार्य यांच्या भूमिका आहेत. शाहरुखच्या रेड चिलिजनं या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात गौरव वर्मा हे को प्रोड्युसर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT