Shah Rukh Khan playing with snakes at Isha Ambani’s twins’ birthday party; video viral SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: अंबानींच्या बर्थडे पार्टीत शाहरुख बनला 'गारुडी'! सापाचा खेळ दाखवुन सर्वांना केले हैराण, व्हिडीओ बघा

शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय

Devendra Jadhav

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा अनेकांचा आवडता अभिनेता. शाहरुख खानने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. शाहरुख खान अनेक सेलिब्रिटींच्या घरी हजेरी लावत असतो.

अशातच शाहरुख काल रात्री अंबानींच्या घरी बर्थडे पार्टीला गेला होता. त्यावेळी शाहरुख सापांशी खेळताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

(Shah Rukh Khan playing with snakes at Isha Ambani’s twins’ birthday party)

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी, ईशा अंबानी यांच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्त शानदार बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या पार्टीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत शाहरुख अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत उभा आहे. आणि अशातच अनंत त्याच्या हातात साप देतो.

या व्हिडीओ पुढे दिसतं की, अनंत शाहरुखकडे साप देतो. राधिका शाहरुखला सापाला कसं हाताळायचं याचं मार्गदर्शन करते. हे सर्व घडत असताना मागुन एक दुसरी व्यक्ती नाजूकपणे SRK च्या गळ्यात दुसरा साप बांधते. शाहरुख आनंदात सापांना सांभाळताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर भिती न दिसता आनंद ओसंडून वाहताना दिसतो.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. शाहरुख आपल्याला नुकताच जवान सिनेमात दिसला. जवानने बॉक्स ऑफीसवर १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. याशिवाय शाहरुखने २०२३ ची सुरुवात पठाण सिनेमाने केली होती. पठाणने सुद्धा बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. आता या वर्षाच्या अखेरीस शाहरुख राजकुमार हिरानींच्या डंकी सिनेमात झळकणार आहे. २२ डिसेंबरला डंकी सिनेमा भेटीला येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

Latest Marathi News Live Update : एनडीए (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीला 'मंगल मिलन' असे नाव देण्यात आले

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

SCROLL FOR NEXT