Ganesh Chaturthi 2023: Esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023: जात धर्माच्या पलीकडे सलमान शाहरुखचं सेलिब्रेशन! थाटामाटात केलं गणरायाचं स्वागत..

Vaishali Patil

Ganesh Chaturthi 2023: काल सर्वत्र गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त सर्व भक्तांनी आपआपल्या घरी गणरायाचं स्वागत केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी विराजमान झाले आहेत.

10 दिवस आता बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांच्या घरी राहतील. यातच बॉलिवूड कलाकारांनी देखील आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या घरीही गणपतीचे आगमन झाले. यावेळी सलमानने देखील बाप्पाचे दर्शन घेतले. आता सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान त्याची भाची आयतसोबत गणरायाची आरती करताना दिसत आहे.

सलमान खानने स्वतः हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत होता. यावेळी सलमान काळ्या कुर्त्यामध्ये दिसला. मामा आणि भाचीचा या गोड व्हिडिओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

तर दुसरीकडे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यानेही आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्यात. आपल्या ट्विटर हँडलवर गणपती बाप्पाचे सुंदर फोटो शेअर करत किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ' बाप्पा जी घरात स्वागत आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्री गणेशाच्या पूजनाच्या अद्भुत दिवसाच्या शुभेच्छा. भगवान गणेश सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खायला देवो!!!'

त्याचबरोबर मंगळवारी गणेश चतुर्थीनिमित्त मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात आला ज्यामध्ये बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला.

यावेळी सलमान खान आणि शाहरुख खान आपल्या कुटुंबियांसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली. शाहरुख खान यावेळी कुटुंबासह आला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. शाहरुख खानसोबत गौरी, धाकटा मुलगा अबराम, सुहाना खान देखील त्याच्यासोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT