Shaheer Sheikh's father 
मनोरंजन

अभिनेत्याचे वडील व्हेंटिलेटरवर; कोरोनाशी देत आहेत झुंज

वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची चाहत्यांना केली विनंती

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता शाहीर शेखचे (Shaheer Sheikh) वडील कोरोनाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. शाहीरने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. 'माझे बाबा व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाशी ते झुंज देत आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा', असं ट्विट शाहीरने केलं. शाहीरच्या या ट्विटवर अनेक नेटकरी आणि त्याच्या सहकलाकारांनी कमेंट्स करत त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना केल्या. (Covid 19)

'संयम ठेव मित्रा, ते लवकरच बरे होऊन घरी परततील', असं अभिनेत्री हिना खाने (Hina Khan) म्हटलंय. 'ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. काही गरज लागल्यास कळव', असं अभिनेता करणवीर बोहराने लिहिलं.

शाहीर शेख सध्या 'पवित्र रिश्ता २' या मालिकेत भूमिका साकारत आहे. शाहीर आणि अंकिता लोखंडेच्या या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. २८ जानेवारीपासून ही मालिका झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात २० हजारांवर पोहोचलेली मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता घसरू लागली आहे. शहरात मंगळवारी ६ हजार १४९ नवे रुग्ण आढळले, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून, मंगळवारी एका दिवसात १२ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: इंधन दरवाढीनंतर महागाईचा भडका! भाजीपाला ते LPG पर्यंत सर्वकाही महागणार? पेट्रोल-डिझेल अजून किती वाढणार?

मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होणार, केरळ अन् महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाने दिले अपडेट

Vasai Crime: महिलेने प्रियकराला संपवलं; पती आणि भावाने दिली साथ, ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीची कशी उकल झाली?

Pune ATS Action: एटीएसची धडक कारवाई! पुण्यातील उषाकिरण रुग्णालय बॉम्ब प्रकरणाचा उलगडा; एटीएसकडून आरोपी नागपुरातून अटकेत

Maharashtra Latest News Live : डिझेल तुटवड्याचा आरोग्य सेवांवर परिणाम; जिल्हा रुग्णालयातील MRI सेवा बंद

SCROLL FOR NEXT