rasika sunil 
मनोरंजन

रसिका सुनीलची उंच भरारी; पाहा विमान उडवतानाचा व्हिडीओ

स्वाती वेमूल

गुरुनाथच्या प्रेमात पडलेली, पदोपदी चुकणारी, लहान मुलीप्रमाणे हट्ट करणारी शनाया अर्थात अभिनेत्री रसिका सुनील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली असताना रसिका परदेशात शिक्षणासाठी गेली. लॉस एंजिलिस याठिकाणी रसिकाने अभ्यासासोबतच इतरही अनेक साहसी गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं. त्यापैकीच एक म्हणजे विमान उडवण्याचं प्रशिक्षण. ज्यावेळी रसिकाने विमान उडवण्याचे धडे गिरवले, त्यावेळचा एक व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

रसिकाच्या या व्हिडीओला ९० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर कमेंट्समध्ये अनेकांनी तिचं कौतुक केलंय. रसिकाला अनेक नवनव्या गोष्टी शिकायची आवड आहे. हीच आवड तिने परदेशातही जपली आहे. परदेशात असतानाही ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असायची. इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ ती सतत शेअर करायची. 

स्कूबा डायव्हिंगचंही घेतलं प्रशिक्षण
रसिकाने अमेरिकेत स्कूबा डायव्हिंगचंही प्रशिक्षण पूर्ण केलं असून यासाठी तिला प्रमाणपत्रही मिळालं आहे. स्कूबा डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी तिला चारशे पानी पुस्तकाचा अभ्यास करावा लागला होता. लेखी परीक्षाही झाली. अनेक शास्त्रोक्त गोष्टी तिला शिकाव्या लागल्या होत्या. "स्कूबा डायव्हिंग केवळ मजा नसून एक जबाबदारीचा खेळ आहे. यात जोडीदाराचीही काळजी घ्यावी लागते. स्कूबा डायव्हिंग करायचे आधीपासूनच मनात होते आणि हे शिकल्याचा फायदेही अनेक आहेत", असं ती म्हणाली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT