Shilpa Shetty Bollywood Actress mother abort her viral interview esakal
मनोरंजन

Shilpa Shetty : 'माझ्या आईला मी नको होते, कारण....' शिल्पानं केला धक्कादायक खुलासा, डॉक्टरांनी स्पष्टपणे तिला सांगितलं होतं..

इंस्टावर तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट्स हा खास चर्चेचा मुद्दाही असतो.

युगंधर ताजणे

Shilpa Shetty Bollywood Actress mother abort her viral interview : बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि फिटनेस फ्रीक म्हणून शिल्पाचे नाव घेतले जाते. वयाची चाळीशी पार केलेल्या शिल्पाचा लूक हा चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय असतो. इंस्टावर तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट्स हा खास चर्चेचा मुद्दाही असतो. अशा शिल्पानं आता एक वेगळाच खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून शिल्पाकडे पाहिले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा एका चित्रपटही आला होता. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र शिल्पाच्या भूमिकेचं चाहत्यांनी कौतुक केले होतं. दोन वर्षांपूर्वी शिल्पाचा पती राज कुंद्राचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याचाही परिणाम शिल्पावर झाला होता. तिनं यावेळी चाहत्यांना काही गोष्टींबाबत आवाहन केले होते.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

सध्या शिल्पा ही तिच्या आगामी सुकी नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. तिनं यावेळी तिच्या आईविषयीच्या काही गोष्टींना उजाळा दिला आहे. शिल्पाच्या आईनं सुनंदा शेट्टी यांनी शिल्पाला एक धक्कादायक गोष्ट सांगितली होती. अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये तो धक्कादायक खुलासा केला होता. आईला माझ्या जन्माच्यावेळेस खूपच त्रास झाला होता. डॉक्टरांनी जास्त काळजी घेण्यास सांगितली होती.

माझ्या जन्माच्यावेळेस आईला खूपच ब्लिडिंग होत होते. तिला डॉक्टरांनी त्या बाळाविषयी खूपच कॉम्लिकेशन्सचा सल्ला दिला होता. तेव्हा आईनं देखील मला जन्मापूर्वीच अबॉट करण्याचा निर्णय घेतला होता. अशी आठवण शिल्पानं एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. ती आठवण सांगताना शिल्पा खूपच भावूक झाल्याचे दिसून आले. १९७५ मध्ये मंगलोर शहरात शिल्पाचा जन्म झाला.

झूम टीव्हीला दिलेल्या त्या मुलाखतीतून शिल्पानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आईचा जीव धोक्यात आला होता जेव्हा मी तिच्या पोटात होते. तिला खूपच शाररीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला होता. शिल्पानं ती आठवण सांगितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT