raj kundra Shilpa Shetty got surpised  
मनोरंजन

राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: पत्नी शिल्पा शेट्टी साक्षीदार

या कंपनीवर शिल्पा शेट्टी ५ वर्ष संचालक होती.

सुरज सावंत

मुंबई: पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात (porn film racket) मुख्य आरोपी राज कुंद्रासह (Raj kundra) आठ जणांच्या विरोधात पोलिसांनी (mumbai police) गुन्हे नोंदवले आहेत. मात्र या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) साक्षीदार बनली आहे. शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह ५५ जण साक्षीदार आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे शिल्पाने पोलिसांना सांगितले आहे. राज कुंद्राने २०१५ मध्ये विहान इडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीवर शिल्पा शेट्टी ५ वर्ष संचालक होती.

२०२० मध्ये शिल्पाने या कंपनीचा राजीनामा दिला. या कंपनीशी संबध असलेल्या हॉटशॉट अ‍ॅप आणि बॉल फेम या अ‍ॅपची माहिती नसल्याचे शिल्पाने सांगितले. राज कुंद्रा मुख्य आरोपी असलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी १५०० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी हेड रायन थॉर्पलाही जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.

पुरवणी आरोपपत्रात साक्षीदार दाखवण्यात आले आहेत. शिल्पा शेट्टी त्यापैकी एक आहे. पाच साक्षीदारांना न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. त्यांनी आरोपींच्या विरोधात जबानी दिली. शिल्पा शेट्टी अजूनतरी राज कुंद्रा विरोधात काहीही बोललेली नाही. कुंद्रा आणि थॉर्प विरोधात हे पुरवणी आरोपपत्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज कुंद्राचा नातेवाईक प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना फरार आरोपी दाखवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT