Shiv Thakare Raksha Bandhan 2023 Esakal
मनोरंजन

Raksha Bandhan 2023: "अपना टाईम आ गया" एकेकाळी एक रुपया ताटात टाकणाऱ्या शिवनं बहिणीला रक्षाबंधनला दिलं 'हे' महागडं गिफ्ट

Vaishali Patil

Shiv Thakare Raksha Bandhan 2023: जगातील सर्वात सुंदर नात म्हणजे बहीण-भावाचं नातं. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं काहीस या नात्याचं असतं. याच बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan).

या सणाची प्रत्येक बहीण आणि भाऊ आतुरतेने वाट पाहत असते. रक्षाबंधन हा सण आज सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भावाने बहिणीला काय गिफ्ट दिलं याचीही चर्चा असते.

अशातच आता बिग बॉस मराठी आणि बिग बॉस 16 मधून घराघरात पोहचलेला शिव ठाकरे याने देखील रक्षाबंधन मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला आहे. आता शिवने त्याच्या बहिणीला असं काही गिफ्ट दिलं आहे की त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सर्वजण त्याचे कौतूक करत आहेत.

शिव ठाकरे याचा आता वेगळा काही परिचय देण्याची गरज नाही. रोडीजमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शिवने बिग बॉस मराठी आणि बिग बॉस 16 मधून लोकप्रियता मिळाली.

दरम्यान, शिवाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चाहत्यांच्या हृदयाला भिडणारा आहे. या व्हिडिओत त्याला त्याचे जुने दिवस आठवले आहेत. ज्यावेळी त्याच्याकडे बहिणीला देण्यासाठी काहीही नसायचं मात्र आता त्याने तिला खुप महागंड गिफ्ट दिलं आहे.

बॉलिवूड चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शिवने याबाबत खुलासा केला. त्याने या व्हिडओत सांगितले की, तेव्हा तो कमवत नव्हतो त्याचे वडिल त्याला ताईला ओवाळणी देण्यासाठी 100 रुपये द्यायचे अन् शिव तिला फक्त एक रुपया द्यायचा. वडिलांनी दिलेले 100 रुपये तो त्याच्याकडेच ठेवायचा. पण यावेळचं रक्षाबंधन त्याच्यासाठी खुप खास आणि वेगळं होतं. त्याने यावर्षी त्याच्या बहिणीला 'आयफोन प्रो 14' मोबाईल भेट म्हणुन दिला आहे.

जेव्हा शिवने त्याच्या बहिणीला मोबाईल भेट दिला त्यावेळी तिला त्यावर विश्वासच बसला नाही असंही तो म्हणाला.

सध्या शिव ठाकरेचा हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. नेटकरी त्याचं कौतुक करत आहे. तो आता सेलिब्रिटी झाला आहे तरी देखील त्याचे जुने दिवस तो विसरलेला नाही अशा अनेक कमेंट त्याच्या व्हिडिओला आहेत.

काही दिवसांपुर्वी शिव आपल्या आई आणि वडिलांसोबत ब्रह्मा कुमारी यांच्या आश्रमात देखील गेला होता. त्याने तिथे रक्षाबंधन साजरा केले होते. ब्रह्माकुमारी यांनी शिवला राखी बांधली होती. त्याचा तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शिवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो स्टंट आधारित रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 13 चा मजबूत स्पर्धक आहे. याशिवाय शिव सोशल मीडियावरही खुप सक्रिय असतो. त्याचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT