shivani rangole birthday wishes to actress kavita medhekar from tula shikvin changlach dhada  SAKAL
मनोरंजन

माझ्या लग्नात आपली भेट झाली तेव्हाच.. शिवानीने ऑनस्क्रीन सासूबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा| Shivani Rangole

शिवानी रांगोळेने तिच्या ऑनस्क्रीन सासूबाईंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या

Devendra Jadhav

Shivani Rangole - Kavita Medhekar: अभिनेत्री शिवानी रांगोळे ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतून शिवानी रांगोळे सध्या भेटीला येत आहे. शिवानीच्या या मालिकेला झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका म्हणुन पुरस्कार मिळाला.

या मालिकेतील शिवानीची ऑनस्क्रीन सासूबाई म्हणजेच अभिनेत्री कविता मेढेकर यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने शिवानीने खास अंदाजात कविता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

शिवानी कविता यांच्यासोबत फोटो पोस्ट करुन लिहीते, "Happy birthday कविता मेढेकर Tai! माझ्या लग्नात आपली पहिली भेट झाली तेव्हाच मी तुला सांगून टाकलं की मी तुझी फॅन आहे! आणि आता तुझ्या बरोबर काम करून मला खूप आनंद होतो की तुझ्याकडून खूप काही शिकण्याची संधी मला मिळते आहे.

तू पहिल्या दिवसापासून माझी मैत्रीण आहेस. आपले ' गप्पांचे कट्टे ' माझे most favourite आहेत! Many many happy returns of the day and here's to many more projects with each other! Love you!'

तुला शिकवीन चांगलाच धडा ही झी मराठीवरची सध्याची चर्चेतली मालिका. मालिकेत शिवानी अक्षराची भुमिका साकारत आहे. तर कविता मेढेकर मालिकेत भुवनेश्वरीची भुमिका साकारत आहेत. यंदाच्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात कविता यांना सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा असे दोन पुरस्कार मिळाले. तर शिवानीला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला. सध्या ही मालिका TRP मध्येही अव्वल असलेली मालिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT