Sruthi Shanmuga Priya husband Arvind Shekar passed away  Esakal
मनोरंजन

Sruthi Shanmuga Priya: लग्नाला एक वर्षही झालं नाही तोच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर काळाचा घाला

बॉडीबिल्डर असलेल्या अरविंदचे वयाच्या 30 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

Vaishali Patil

Sruthi Shanmuga Priya husband Arvind Shekar passed away: प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री श्रुती षणमुगा प्रिया हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. श्रुतीचा पती अरविंद शेखरचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झालं आहे.

श्रुती षणमुगा प्रियाचा पती अरविंद शेखर यांचे बुधवार, 2 ऑगस्ट 2023 रोजी निधन झालं. बॉडीबिल्डर असलेल्या अरविंदचे वयाच्या 30 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

त्याची पत्नी श्रुती षणमुगा प्रिया ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाला एकच वर्ष झाले होते. या जोडप्याने नुकतचं त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अरविंदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तो वाचू शकला नाही. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अरविंद हा फिटनेस कोच देखील होता आणि गेल्या वर्षी त्याने मिस्टर तामिळनाडूचा किताब पटकवला होता.

काल श्रुतीने तिच्या पतीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. याबद्दल माहिती देत तिनं एक इमोशनल पोस्ट शेयर केली . तिने लिहिलं की, "फक्त आपलं शरीर एकमेकांपासून वेगळे झालं आहे, पण तुझा आत्मा आणि मन नेहमीच माझ्यासोबत असेल.

ते नेहमीच माझे रक्षण करतील. अरविंद तुला शांती लाभो. माझं तुझ्यावरील प्रेम आता जास्त झालं आहे. आपल्या एकमेकांसोबतच्या खूप आठवणी आहेत ज्या मी आयुष्यभर जपेल. मला तुझी खुप आठवण येते. अरविंद माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे. तु नेहमीच माझ्या सोबतच आहे."

ही बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर लोक तिला धीर देत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, षणमुगा प्रियाने 'वाणी राणी', 'कल्याणा परिसू', पोन्नंचल आणि भारती कन्नम्मा यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

पुण्यात टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांचा राडा; महापालिकेत शिवीगाळ आणि गोंधळ, VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये महिलांची बाईक रॅली

TCS AI Project: TCS सोबत योगी सरकारचा युपीमध्ये मोठा प्लॅन! AI क्रांतीमधून हजारो जॉब्सची निर्मिती

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT