disha patani and rahul vaidya social media
मनोरंजन

दिशा पटानीच्या हॉट फोटोवर राहुल वैद्य फिदा; कमेंट करत म्हणाला..

राहुल वैद्यच्या कमेंटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस सिझन 14 मुळे चर्चेत आलेला गायक राहुल वैद्यचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या गाण्यांमुळे आणि हॅण्डसम लूकमुळे तो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. राहुल सोशल मीडियावर सक्रिय असतो. राहुल आणि अभिनेत्री दिशा परमारच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. राहुलने बिग बॉसमध्ये असताना दिशाला प्रपोज केले होते. तेव्हा तिने बिग बॉसच्या घरात सरप्राईज एन्ट्री घेऊन राहुलला प्रेमाची कबूली दिली होती. पण बिग बॉस स्पर्धेतून बाहेर पडताच राहुल एका दुसऱ्याच दिशावर फिदा झाल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे कायमच चर्चेत असेत. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर बसली असून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. दिशाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून दोन लाखांहून अधिक लाइक्स या फोटोला मिळाले. अनेकांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. पण त्यात राहुल वैद्यच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राहुलने कमेंट करत ‘दिशा हे नावंच खास आहे’ असे म्हटले आहे. राहुलने कमेंटमध्ये राहुलने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारला टॅग केले आहे.

हेही वाचा : समंथा, सोहा, श्रुती... 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थचे अफेअर्स

राहुल वैद्य आणि दिशा परमारचे काही दिवसांपूर्वी ‘मधन्या’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यामधील राहुल आणि दिशाच्या लूकमुळे त्याचे लग्न झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पण नंतर हा लूक त्यांनी गाण्यासाठी केला होता आणि लवकरच ते खऱ्या आयुष्यातही लग्न करणार आहेत असे राहुलने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT