Sippy Gill Accident famous singer's terrible accident video viral SAKAL
मनोरंजन

Sippy Gill Accident: भरधाव गाडी उलटली अन्... सुप्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात! व्हिडिओ समोर

सुप्रसिद्ध गायक सिप्पी गिलचा अपघात झाल्याची बातमी समोर आलीय

Devendra Jadhav

Sippy Gill Accident: पंजाबी संगीत विश्वातून वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिलचा अपघात झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा गायक कॅनडामध्ये होता.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये त्याची 'रुबिकॉन' ही कार उलटली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः सिप्पीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Sippy Gill Accident famous singer's terrible accident! Front of the video)

सिंगरने व्हिडिओ शेअर केला आहे

सिप्पीने गाडी पलटल्याचा व्हिडीओ शेअर केलाय. आणि म्हणाला- "मी सर्व मित्रांसोबत कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझ्या मित्रांनी बाहेर न येता रुममध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

ऑफ-रोडिंगसाठी मी एकटाच बाहेर गेलो होतो. मी रुबिकॉनमध्ये प्रवास करत असताना कार उलटली. मला किरकोळ दुखापत झाली आहे पण कारचे मोठे नुकसान झाले आहे. तेथून जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाने मला मदत केली. आणि कार बाहेर काढण्यात मदत केली. या रस्त्यावर अशा घटना सतत घडत असतात, असं तो नागरिक म्हणाला. चांगली गोष्ट म्हणजे सिप्पीला कमी दुखापत झाली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती."

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सिप्पीची गाडी वाईट पद्धतीने पलटली आहे. पण या मोठ्या अपघातातून सिप्पीचा जीव वाचला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिप्पीने या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओत तो हसताना दिसतोय. अशा परिस्थितीत काही लोक त्याला ट्रोलही करत आहेत. वरून गाडीचेही नुकसान झाल्याचे तुम्ही पाहू शकता.

सिप्पी गिल हा त्यांच्या पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांच्या यादीत त्यांचा समावेश आहे.

त्याचे 'सोलमेट' हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याशिवाय 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'बेकदरा' या गाण्याला आतापर्यंत 180 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हे सिप्पीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट गाणे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT