Saif Ali Khan, Soha Ali Khan
Saif Ali Khan, Soha Ali Khan Google
मनोरंजन

बहिणीसोबत फोटोशूट करताना सैफच्या चेहऱ्यावरचं हसू का हरवलं?

प्रणाली मोरे

सैफ अली खान (Saif Ali Khan),सबा अली खान आणि सोहा अली खान (Soha Ali Khan) ही तीन मुलं आहेत इंडस्ट्रीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांची. ही तिन्ही भावंडं एकमेकांत खूप छान बॉन्डिंग शेअर करतात. यांच्यात सोहा सगळ्यात धाकटी तर सैफ सगळ्यात मोठा. सबा फारशी यांच्यासोबत दिसत नसली तरी सैफ आणि सोहा मात्र एकमेकांच्या कुटुंबासोबत अनेक कार्यक्रमांतून दिसत असतात. अनेकदा हे दोघे आपल्या कुटुंबासोबत फॅमिली टाईम एन्जॉय करण्यासाठी पिकनिकवरही एकत्र गेलेले दिसतात. पण आता नेमकं यांच्यात असं काय झालं की आपल्याच होमब्रॅंड पतौडी हाऊस च्या प्रमोशनल फोटोशूटसाठी दोघे एकत्र आले पण....वाचा सविस्तर

Saif Ali Khan,Soha Ali Khan

सैफ आणि सोहा हे दोघे पतौडी हाऊसची धुरा सांभाळत आहेत. या ब्रॅंडचा ते दोघे चेहरा आहेत. त्यामुळे अर्थातच तो प्रमोट करण्यासाठी त्यांना अनेकदा फोटोशूटसाठी एकत्र यावं लागतं. अर्थात एरव्ही याआधी ते हे शूट एन्जॉय करताना दिसले आहेत. पण आता नेमकं असं काय झालं की यावेळेस फोटोशूटसाठी ते एकत्र आले खरे पण त्यावेळी जे स्माइल चेहऱ्यावर लागतं ते मात्र दोघांना उसनं अवसान आणून आणावं लागत होतं. या फोटोशूटच्यावेळी या दोघांनाही फोटोपोझ देताना हवीतशी स्माईल चेहऱ्यावर आणताना कठीण जात होतं. आणि ही एडचण सैफला जास्त जाणवत होती. तेव्हा सैफने स्वतः आपल्या क्रू ला विनंती केली की,''अरे आम्हाला हसवा,आमचा उत्साह वाढवा,आमच्यानं ते होत नाही आहे'' तेवढ्यात त्यांच्या क्रु मेंबर्सपैकी कुणीतरी काहीबाही बोललं अनं सोहा-सैफच्या चेहऱ्यावर आलं एकदाचं हसू आणि मग खटाखट फोटोग्राफरने फोटो काढून घेतले. यावेळचा भावा-बहिणीचा धमाल केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो सोहानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आता दोघांमध्ये काही बिनसलं नाही हे आम्ही थोडं स्पष्ट करतो इथे. कारण असं होतं कधी-कधी फोटोशूट करताना की स्माईल करण कठीण जातं. बातमीत जोडलेला व्हिडीओ पाहिला की येईल लक्षात आपल्या.

त्यांच्या या व्हिडीओवर बहिण सबानं प्रतिक्रिया दिली आहे,''लव्ह यू'', तर गायिका शाल्मली खोब्रागडेनं लिहिलंय,''उफ...खूप सुंदर क्षण''. तर यावर एका चाहत्यानं लिहिलंय,''सैफनं कुर्त्याला मागून क्लिप लावलेला फक्त मलाच दिसत आहे का?'' तर एकानं सोहाने शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलीय की,''तुझ्या भावाला सांग मला त्याचं काम फार आवडतं''. तर एका चाहत्यानं लिहिलंय,''तुम्हा दोघांमधील भाव-बहिणीचं नातं मला फार आवडतं. मी देखील माझ्या भावासोबत असं नातं शेअर करते''. तर एकानं लिहिलंय,''भावा-बहिणीची जोडी कमाल''. सैफचा 'बंटी और बबली २' हा सिनेमा आपल्या भेटीस येऊन गेला आहे. आता तो आपल्याला रामायणवर आधारित 'आदिपुरुष' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात प्रभास,क्रिती सननही पहायला मिळणार आहेत. यासोबतच सैफ विक्रम वेधाच्या सिनमात हृतिक रोशन,राधिका आपटे आणि रोहित सराफ यांच्यासोबत दिसणार आहे. तर दुसरीकडे सोहाला नुकतंच आपण 'कौन बनेगी शिखरवती' या सिनेमात पाहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT