Sonali Kulkarni Instagram
मनोरंजन

'आमच्या घरी १२ महिने मराठी भाषा साजरी होते';सोनालीचा व्हिडीओ चर्चेत

सोनाली कुलकुर्णी काही दिवसांपूर्वी तिच्या 'द व्हिसल ब्लोअर' वेबसिरीजमुळे चर्चेत होती.

प्रणाली मोरे

सोनाली कुलकर्णीनं (Sonali Kulkarni) अनेक गाजलेली मराठी नाटकं,मराठी सिनेमांसोबतच अनेक हिंदी सिनेमा,आतंरराष्ट्रीय सिनेमात आपल्या अभिनयाची मोहर उमटवेली आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. आजही ती मराठी इतकीच किंबहुना कांकणभर अधिक हिंदी इंडस्ट्रीत व्यस्त असते. तिनं नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपलं अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिची 'द व्हिसल ब्लोअर' ही वेबसिरीज आपल्या भेटीस आली होती. त्यातनं तिनं साकारलेल्या भूमिकेचं कौतूकही झालं. पण मग अनेकदा वाटतं हे आपले मराठमोळे स्टार हिंदीत रमले की परतत नाही. किंवा त्यांना मराठी संस्कृतीचा विसर पडत असेल. असं काहींच्या बाबतीत होत असेल पण आपली मराठमोळी सोनाली मात्र त्याला अपवाद ठरली आहे. 'मराठी भाषा दिना(Marathi Bhasha Din) निमित्त' तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला अन् तिचा अभिमान वाटून गेला.

सोनालीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिची नऊ वर्षांची मुलगी कावेरी हिसुद्धा दिसत आहे. घराच्या भिंतीवर एक फळा दिसतोय. आता अनेक घरांतून खरंतर तो तसा फळा कालबाह्य झाला असेल बहुधा. पण त्या फळयावर काय लिहिलंय हे जर आपण पाहाल तर नक्कीच थक्क होऊन जाल. या फळ्यावर लिहिले आहेत चक्क काही मराठी शब्द. 'कडुलिंब,श्रीखंड,गुढीपाडवा,चैत्रागौर,नववर्ष...' ्असे स्खलित मराठी भाषेतले हे शब्द सोनालीच्या मुलीनं लिहिले आहेत बरं का.

आणि मराठी भाषा दिन असा वेगळ्या प्रकारे साजरा करताना सोनालीनं लिहिलंय,'आमच्या घरी १२ महिने मराठी भाषा साजरी होते'. यावर तिच्या चाहत्यांनी मात्र तिचं भरभरुन कौतूक केलं आहे. आणि खरंच आज इंग्रजी भाषेनं प्रत्येक मराठी माणसावर राज्य करायला सुरुवात केली आहे,असं असताना सोनालीनं ही हुकमत झिडकारुन देत मराठीचा झेंडा आपल्या घरात फडकवत ठेवला आहे याचं करावं तितकं कौतूक कमीच,आणि आजच्या पिढीतल्या कावेरीचं देखील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT