sonu sood  
मनोरंजन

लाठीखेळ करुन व्हायरल होणा-या त्या ८५ वर्षीय आजींना सोनू सूद कडून खास ऑफर..

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज करतोय. कोणाला काहीही हवं असेल तर ते सरळ सोनू सूदला ट्वीट करत आहेत किंवा मग फोन करुन संपर्क साधत आहेत. सोनू देखील त्याच्या प्रत्येक चाहत्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करुन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकवेळा चर्चा करत असताना सोनूला मजेशीर अंदाज देखील पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा सोनू सूदचे एक ट्विट चर्चेत आलंय. या ट्विटमध्ये सोनूने लाठीवाल्या आजींची माहिती मागितली आहे. थोड्यावेळापूर्वीच सोनूने ट्विटवर त्या माणसाची देखील माहिती मागितली होती ज्याने त्यांच्या मुलांच्या अभ्यासासाठी मोबाईल हवा म्हणून त्यांची गाय विकली होती. आता पुन्हा एकदा सोनू या आजींच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे.

शूटर दादी नावाने प्रसिद्ध असलेल्या निशाणेबाज चंद्रो तोमर या सोशल मिडियावर चांगल्याच ऍक्टीव्ह असतात. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलंय, लाठीवाल्या आजींचा विजय असो. अनेकांचा घाम काढतील या आजी. या व्हिडिओमध्ये ८५ वर्षांच्या आजी त्यांच्या दोन्ही हातांनी अप्रतिमरित्या लाठीकाठीचा खेळ दाखवताना दिसत आहेत. आणि हा खेळंच त्यांच्या जगण्याचं साधन असल्याचंही दिसत आहे. चंद्रो तोमर या अनेकदा मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. 

अभिनेता सोनू सूद या लाठीवाल्या आजींचा व्हिडिओ पाहून प्रभावित झाला. त्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं, 'मला यांची काही माहिती मिळू शकेल का? मी यांच्यासोबत एक छोटीशी ट्रेनिंग शाळा सुरु करु इच्छितो. जेणेकरुन आपल्या देशातील महिलाांना स्वतःच्या सुरक्षिततेच्या टेक्निक्स शिकता येतील.'

बस्स सोनूने हे फक्त सांगायला आणि लोकांनी त्याला त्या आजींचा संपूर्ण बायोडाटाच द्यायला सुरुवात केली. अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या संकट काळात अनेक लोकांना मदत केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या इतकंच नाही तर देशाबाहेरही जे लोक अडकले आहेत त्यांना देशात परत आणण्याच्या कामात सोनूने स्वतःला वाहून घेतलं आहे. त्यामुळे त्याचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय.  

sonu sood ask 85 years old lady details on social media as he wants to work with her  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT