Sonu Sood offered movie to MTV Roadies contestant Shubham Chaudhary hearing impaired contestant  sakal
मनोरंजन

Sonu Sood: सोनूनं पुन्हा मन जिंकलं.. रोडीज् मध्ये आलेल्या कर्णबधिर मुलाला थेट दिली 'ही' ऑफर..

सोनू सुद सध्या एम टीव्ही रोडीज होस्ट करत आहे, यावेळी त्याने पुन्हा एकदा स्वतःची जादू दाखवली.

नीलेश अडसूळ

Sonu Sood News: साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सोनू सूद आज लोकांसाठी मसिहा बनला आहे.

पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू कोरोना या कामात खरा हिरो म्हणून पुढे आला सोनूने प्रवासी मजुरांपासून ते कोरोनाच्या कामात अडचणीत सापडलेल्या सर्वांना ज्या प्रकारे मदत केली ते कोणीही विसरू शकत नाही.

आजही त्याच्या घरासमोर लोकांची गर्दी असते आणि त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो.

सध्या तो 'एम टीव्ही रोडीज' कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहेत. पण सोनूने याही मंचावर आपला दानशूरपणा दाखवून दिला आहे. या शो मध्ये आलेल्या कर्णबधिर मुलाला त्याने एक मोठी ऑफर दिली आहे.

(Sonu Sood offered movie to MTV Roadies contestant Shubham Chaudhary hearing impaired contestant)

सोनू सध्या रोडीजचा नवीन सीझन होस्ट करत आहे. MTV रोडीज सीझन 19 च्या ऑडिशन्स दरम्यान, गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील शुभम चौधरी नावाच्या स्पर्धकाने आपल्या प्रतिभेने सर्वांनाच चकित केले आहे.

पण शुभम हा कर्णबधिर आणि मुकबाधिर आहे. त्याला बोलता येत नाही. तरीही केवळ कर्णबधिर आणि मुकबाधिर मुलंही आयुष्यात काहीही करू शकतात हे दाखवण्यासाठी तो या खेळात दाखल झाला आहे.

शुभम असा असूनही त्याने आपली जिद्द आणि चिकाटी दाखवून सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्यामुळे सोनू सूदनेही त्याला एक खास भेट दिली.

सोनूने त्याला त्याच्या होम प्रॉडक्शनमधील "फतेह" या चित्रपटामध्ये एक खास भूमिका ऑफर केली आहे. रोडीज मध्ये नेहमीच कठोर आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून सोनूची ओळख आहे, पण त्याने या गोष्टीने सगळ्यांचीच मनं जिंकली.

शुभमने सोनू सुद पुढे अभिनेता बनण्याची इच्छा बोलून दाखवली आणि सोनूने त्याला थेट भूमिका ऑफर केली. समाजाच्या भल्यासाठी नेहमीच हातभार लावणाऱ्या लोकांना अशा संधी उपलब्ध करून देत असताना सोनू यात कोणतीही कसर सोडत नाही, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

अशा एका मुलाला कामाची संधी देऊन त्याने त्याची वेगळी बाजू जगासमोर आणली. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणा मुळे चर्चेत आहे एकोणिसाव्या सीझनकडे वाटचाल करत असताना तो प्रेक्षकांना अश्या गोष्टीमुळे अधिकच भावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT