Sonu Sood's son is taking bowling lessons from Mohammed Shami ind vs aus 2023 SAKAL
मनोरंजन

Mohammed Shami: मोहम्मद शमीकडून सोनू सूदचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे, व्हिडीओ व्हायरल

सोनू सूदने त्याचा मुलगा मोहम्मद शमीकडून गोलंदाजीचे धडे गिरवत असल्याचं सांगितलंय

Devendra Jadhav

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये काल वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगला. भारताला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने त्याच्या गोलंदाजीने विरुद्ध टीमला जेरीस आणले. मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतले.

अशातच अभिनेता सोनू सूदने त्याचा मुलगा मोहम्मद शमीकडून क्रिकेटचे धडे गिरवत असल्याचं सांगितलंय.

(Sonu Sood's son is taking cricket lessons from Mohammed Shami ind vs aus 2023)

काही दिवसांपुर्वी अभिनेता सोनू सूदने त्याचा धाकटा मुलगा अयानचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत अयानला मोहम्मद शमी क्रिकेटचे धडे देत असल्याचं दिसतंय. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केलाय.

वर्ल्डकपच्या माहोलमध्ये सोनूने हा व्हिडीओ शेअर करत मोहम्मद शमी लेकाला क्रिकेटचे धडे देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. सोनू सुद्धा या व्हिडीओत दिसतोय.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शमी मुलाला क्रिकेटचे धडे देत असल्याबद्दल अभिनेत्याने आनंद आणि अभिमान व्यक्त केलाय.

दरम्यान सोनू सूदने त्याचा आगामी चित्रपट ‘फतेह’ चं शूटींग पूर्ण केलं आहे. शक्ती सागर प्रॉडक्शनद्वारे, अभिनेत्याने झी स्टुडिओसह "फतेह" ची सह-निर्मिती केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजन देईल असे त्याने सांगितले आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेले अॅक्शन सीक्वेन्स फतेह सिनेमात बघायला मिळतील. फतेह सिनेमा २०२४ ला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT