Ajay Purkar In tollywood Esakal
मनोरंजन

Ajay Purkar : साउथचे भलेभले व्हिलन होणार फेल! मराठमोळे अजय पूरकर आता गाजवणार टॉलिवूड

Vaishali Patil

Ajay Purkar in Tollywood : गेली १५ वर्षे नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या माध्यमांतून घरोघरी पोचलेल्या आणि चोखंदळ रसिकांनी वाखाणलेल्या दर्जेदार मराठी अभिनेत्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे अजय पूरकर.

अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात उत्तम गती असलेल्या अजय पूरकर यांचे नाव अनेक गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे.

नाणं खणखणीत असलं की, ते कुठेही वाजतंच. तेव्हा त्याला भाषा,प्रांत, प्रदेश यांच्या सीमा नसतात. असंच काहीस आता अजय पूरकर यांनी सिद्ध केलं आहे.

सध्या ते ‘सुभेदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अभिनयाच्या जोरावर अजय पूरकर यांनी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. मराठी मनोरंजन विश्वाला अभिनयानं वेड लावणाऱ्या अजय पूरकर यांनी आता टॉलिवूडमध्येही एंट्री केली आहे.

१५ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘स्कंदा’ या दाक्षिणात्य अ‍ॅक्शन चित्रपटात अजय पूरकर खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे.

अजय पूरकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भुमिका साकारली होती. या भुमिकेने प्रेरित होत प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांनी अजय पूरकर यांना ‘स्कंदा’ चित्रपटात विषेश भुमिकेसाठी विचारणा केली होती.

याबद्दल बोलतांना अजय पूरकर यांनी सांगितले की, आपल्या कामावर इतकं बारकाईनं लक्ष ठेवून दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाने याची नोंद घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तसच हैद्राबाद येथील चित्रीकरणादरम्यान कामाविषयी पावित्र्य जपत प्रत्येक दिवशी वेगळी पूजाअर्चा करण्याचा अनुभव खूप काही सांगून जाणारा व शिकवणारा होता.

‘स्कंदा’ या चित्रपटामुळे या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्याचा आनंद व्यक्त करतानाच, एका उत्तम कॅनव्हासवर काम केल्याचा आनंद, अजय पूरकर यांनी व्यक्त केला.

‘स्कंदा’ चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. या प्रमोशन दरम्यान सुप्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांनी अजय पुरकर यांचे भरभरून कौतुक केलं आहे.

अजय पुरकर यांचा स्कंदा हा चित्रपट येत्या 15 सप्टेंबर 2023 रोजी रिलिज होणार आहे. साऊथ चित्रपटामधील त्याचा अभिनय पाहण्यासाठी चाहते खुप उत्सूक आहेत.
(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT