मनोरंजन

...म्हणून सुजय डहाके झाला ट्रोल

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : जातीयवादावरून नेहमीच वेगळे राजकारण होताना दिसते. पण आता मराठी चित्रपटसृष्टीतही सध्या जातीयवाद होताना दिसतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सुजय डहाकेमुळे हा जातीयवाद समोर आला आहे. एका मराठी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत जातीय भेदभाव आहे असे त्याने म्हटले आहे.

"अनेक मराठी वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेतील अभिनेत्री ही ब्राम्हणचं का असते? इतर मुली का नसतात?' असं विधान त्याने केले आहे. त्याने केलेल्या या विधानाने सध्या त्याला ट्रोल केलं जातंय. त्याच्या या जातीयवादाच्या विधानाने मराठी चित्रपटसृष्टी पेटून उठली आहे. या विधानावर मराठी कलाकार सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्याने केलेल्या विधानाचा निषेध करत आहेत.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने, "मी ब्राम्हण नाहिए बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्षे माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?' असा प्रश्‍न मांडत सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत निषेध केला आहे. तर "कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली मी रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती-धर्माचा आहेस याचा जराही विचार डोक्‍यात न आणता तुझं चांगलंच होऊ दे. तुझे चित्रपट चालू दे हीच इच्छा आहे.' अशी पोस्ट अभिनेता शशांक केतकरने सोशल मिडियावर शेअर करत सुजयला टोला लगावला आहे. त्याचबरोबर अभिनेता सौरभ गोखलेनंही याबाबत आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला की,"आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील इतर लोकांनी उत्तरे द्यावीत इतकी लायकी नाही आहे. पुन्हा याप्रमाणे जातीयवाद-जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी,' अशी पोस्ट शेअर करत त्याने सुजयवर टीका केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT