Relationship with Shahrukh Khan matured with time Sunny Deol 
मनोरंजन

Sunny Deol : 'वेळेनुसार प्रत्येकाला...', शाहरुखसोबतच्या मैत्रीवर सनी देओल बोललाच!

सनी देओल आणि किंग शाहरुख खान यांच्या मैत्रीविषयी नेहमीच बोलले जाते.

युगंधर ताजणे

Relationship with Shahrukh Khan matured with time Sunny Deol : गदर २ मधून सनी देओल पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचला. त्या चित्रपटानं तब्बल हजार कोटींची कमाई केल्याचे दिसून आले. २२ वर्षांच्या अंतरानं गदर चा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. गदर २ च्या मोठ्या यशानंतर मोठ्या ग्रँड पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते.

सनी देओल आणि किंग शाहरुख खान यांच्या मैत्रीविषयी नेहमीच बोलले जाते. या दोघांनी डर या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. ९० च्या दशकांतील या चित्रपटानं शाहरुख नावाच्या अभिनेत्याची प्रेक्षकांना नव्यानं ओळख झाली होती. सनीच्या त्या चित्रपटातील अभियनाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. मात्र त्यानंतर ते दोघेही पुन्हा कधीही एकत्र दिसले नाहीत.

सनीनं गदर २ च्या निमित्तानं ज्या मुलाखती दिल्या होत्या, त्यावेळी त्यानं शाहरुख सोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. त्यानं केवळ शाहरुखच नाहीतर सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार यांच्याबरोबरील नात्यावर स्पष्टपणे भाष्य केले होते. गदर २ च्या सक्सेस पार्टीमध्ये तर बॉलीवूडमधील अनेक कलावंतांनी भाग घेतला होता. त्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगण, शाहिद कपूर अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले होते.

सनीनं एका मुलाखतीतून पुन्हा एकदा शाहरुखसोबतच्या नात्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचे म्हणणे आहे की, काळानुसार आमच्या मैत्रीमध्ये बदल होत गेला. तेव्हा जी भांडणं किंवा वाद झाले तेच आता पुन्हा घेऊन नातं टिकणार नाही. याची कल्पना आहे. त्यामुळे आता आमच्यातील संबंध चांगले झाले आहेत. त्यात पुन्हा एकदा भावनिक नातं तयार झाले आहे.

१९९३ मध्ये सनी आणि शाहरुखचा डर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाच्या दरम्यान दोन्ही सेलिब्रेटींमधील संबंध दुरावल्याचे दिसून आले होते. तेव्हापासून या दोन्ही अभिनेत्यांमध्ये अबोला होता. तो आता इतक्या वर्षांनी दूर झाल्याचे बोलले जात आहे. शाहरुख आणि सनीचे एकत्रित व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सनी म्हणाला की, माझ्या गदर २ च्या ग्रँड पार्टीचे आय़ोजन करण्यात आले होते. त्याला मी शाहरुखला देखील निमंत्रण दिले होते. तो त्यावेळी त्याच्या जवानच्या प्रमोशनसाठी दुबईमध्ये होता. पण तो वेळ काढून आला. त्यानं गळाभेट घेत फोटोही काढले. आमच्यातील दुरावा तेव्हाच संपला.अनेक गप्पागोष्टीही झाल्या. अशी आठवण सनीनं यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT