Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding: Esakal
मनोरंजन

Suruchi- Piyush Wedding: अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! अभिनेत्री सुरुची सोबत बांधली लग्नगाठ

सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

Vaishali Patil

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding: सध्या मनोरंजन विश्वात लग्न सराई सुरु झाली आहे. एकामागे एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतच रणदीप हुड्डाने त्याची प्रियकर लिन लैशरामसोबत लग्न केले तर मराठी विश्वात अमृता देशमुखने अभिनेता प्रसाद जवादेसोबत लग्नगाठ बांधली.

आता पुन्हा एक लोकप्रिय कपल लग्न बंधनात अडकले आहे. 'का रे दुरावा' आणि 'अंजली' या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) आणि पियुष रानडे (Piyush Ranade) यांनी लग्न केले आहे.

दोघांनीही गुपचूप लग्न केले आहे आणि सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत चाहत्यांना ही गोड बातमी देत सुखद धक्का दिला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी एका आश्चर्याचा धक्का देणारी होती.

पियुष आणि सुरुची यांनी 'अंजली' या मालिकेत एकत्र काम केले आहे. दोघेही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील आणि तितकच लोकप्रिय कलाकार आहेत. पियुष आणि सुरुचीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सुरुची अडारकर अन् पियुष रानडे यांनी लग्नसोहळ्याचे फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आनंदी दिवस. या फोटोत नवीन कपल खुपच सुंदर दिसत आहे. लग्नासाठी दोघांनी दाक्षिणात्य लूक केला होता.

दोघांनीही पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. दोघांनीही यापुर्वी आपल्या नात्याबद्दल काहीच उघड केले नव्हते. त्यांच्या नात्याच्या चर्चाही नव्हत्या.

त्यामुळे आता थेट लग्नाचे फोटो शेयर करुन त्यांनी चाहत्यांना धक्का दिला. या फोटोवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता पियुष रानडे बद्दल बोलायचं झालं तर मिडिया रिपोर्टनुसार, हे पियुषचे तिसरे लग्न आहे. अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत पियुषने पहिल्यांदा लग्नगाठ बांधली होती.

त्यानंतर त्याने मयुरी वाघसोबत दुसरं लग्न केलं होतं. मात्र त्याचे दोन्ही लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. काही वर्षातच त्याचा घटस्फोट झाला. आता पियुषने सुरुचीसोबत तिसरे लग्न केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT