bollywood actor sushant singh rajput suicide case  Team esakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput Case: NCB चीफ यांना उत्कृष्ट तपासासाठी मेडल

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराची भावना निर्माण कलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा अकालीच गेला.

युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराची भावना निर्माण कलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा अकालीच गेला. त्यानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सुशांत सिंग राजपुतच्या केसच्या निमित्तानं मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सुशांत सिंग राजपुतच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एका अधिकाऱ्याचा गौरव करण्यात आला आहे. एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना मेडल फॉर एक्सीलन्स इन इन्वेस्टिगेशन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.

सप्टेंबरच्या 2020 मध्ये वानखेडे यांनी बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. त्यात त्यांच्या हाती महत्वाची माहिती लागली होती. त्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासेही समोर आले होते. वेगवेगळ्या सेलिब्रेटींची नावं उजेडात आल्यानं बॉलीवूडविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यात कित्येक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या नावाचा समावेश होता. वानखेडे यांच्या टीमनं ड्रग्जशी संबंधित जे धंदे होते ते बंद करुन संबंधितांना अटक केली होती. तसेच या प्रकरणाशी संबंध असणाऱ्या सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले आहे. सध्या हे दोघेही जामिनावर बाहेर आहे.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एनसीबीनं आतापर्यत दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांच्या सहीत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीही समोर आले होते. या सेलिब्रेटींना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. त्यावेळी बॉलीवूडमध्ये नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT