Swapnil Joshi shared tweet and said he wants to share screen with late veteran actress smita patil sakal
मनोरंजन

Swapnil Joshi: ती सल कायम राहिल माझ्या मनात.. स्वप्नील जोशीने व्यक्त केली खंत..

चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेता स्वप्नील जोशीने ट्विट करत सांगितली मनातली एक खास बात...

नीलेश अडसूळ

Swapnil Joshi: मराठीतला सुपरस्टार म्हणून स्वप्निल जोशी सर्वप्रचलित असला तरी हिंदी इंडस्ट्रीतही त्यानं केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यानं साकारलेला कृष्ण तर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

स्वप्निल हा खरंतर रोमॅंटिक सिनेमातला हिरो..चॉकलेट बॉयच म्हणूया नं त्याला. 'दुनियादारी', 'तु ही रे', 'मितवा' अशा त्याच्या अनेक सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. नुकताच तो 'वाळवी' सिनेमातून एकदम वेगळ्या भूमिकेतून समोर आला. याची चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली.

असा मराठी प्रेक्षकांचा फेव्हरेट असणारा स्वप्निल जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे, नुकतेच त्याने ट्विटर च्या माध्यमातून चाहत्याशी संवाद साधताना आपल्या मनातली खंत व्यक्त केली.

स्वप्नीलला चाहत्यानं ट्विटरवर प्रश्न विचारला की, 'मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी एक कुठली अभिनेत्री किंवा अभिनेता आहे?  ज्यांच्या सोबत काम करायचं आहे  पण  त्यांच्यासोबत काम करण्याचा अजून योग आला नाही?'

त्यावर स्वप्नीलनं ही ट्विटर वर उत्तर दिलंय, 'आणि दुर्दैवने हा योग येणार पण नाही!  पण मला स्मिता पाटील जी यांच्या बरोबर एक फ्रेम तरी शेअर करायला मिळायला हवी होती! ती सल कायम माझ्या मनात राहिल!'

सध्या स्वप्नील झी मराठी वरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेत झळकत आहे. स्वप्नील या मालिकेत 'सौरभ ' हे पात्र साकारत असून त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. स्वप्नीलचा वाळवी हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात स्वप्नील इतक्या वेगळ्या भूमिकेत दिसला की त्याच्या भूमिकेचे अजूनही कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

Accident : थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; रक्षाबंधन उरकू‌न घरी जाताना झाला होता अपघात

IND vs PAK Asia Cup: भारताची विजयी हॅटट्रिक! ९ षटकांत जिंकली मॅच, पाकिस्तानची इतकी वाईट अवस्था कधी झालीच नव्हती

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

SCROLL FOR NEXT