Swara Bhaskar 
मनोरंजन

'तुझ्यापेक्षा आमची मोलकरीण चांगली दिसते' म्हणणाऱ्याला स्वराचं सडेतोड उत्तर

ट्विटमुळे स्वरा पुन्हा चर्चेत

स्वाती वेमूल

अभिनेत्री स्वरा भास्कर Swara Bhasker नेहमीच तिच्या ट्विट्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ट्रोलर्सना दुर्लक्ष न करता ती अनेकदा सडेतोड उत्तरं देते. स्वराने नुकताच तिचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट केलं, 'तुझ्यापेक्षा आमची मोलकरीण चांगली दिसते'. नेटकऱ्याच्या या कमेंटवर स्वराने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. बुधवारी स्वराने साडी परिधान केलेला स्वत:चा फोटो ट्विटरवर पोस्ट केला.

मोलकरीण तुझ्यापेक्षा चांगली दिसते असं म्हणणाऱ्याला स्वराने उत्तर दिलं, 'तुमची मोलकरीण सुंदर असेल याची मला खात्री आहे. तुम्ही तिच्या कामाचा आदर करत असाल आणि तिच्यासोबत मूर्खासारखं वागत नसणार अशी मी अपेक्षा करते.'

स्वराने 'तनू वेड्स मनू', 'रांझना', 'तनू वेड्स मनू रिटर्न्स', 'प्रेम रतन धन पायो', 'नील बट्टे सन्नाटा', 'वीरे दी वेडिंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. गेल्या वर्षी तिचा 'रसभरी' हा ओटीटी प्रोजेक्ट चर्चेत होता. तिचा 'शीर कुर्मा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वसईत उघड्या गटाराने घेतला चिमुरड्याचा बळी! दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

'तुला शिकवीन चांगलाच धडा'ची भुवनेश्वरी इतकी वाईट का होती? कविता मेढेकर म्हणाल्या, 'ज्यांना पूर्वी काहीच मिळालेलं नसतं...'

Water Crisis: बारामतीच्या हक्काचे पाणी सोडा ; अन्यथा गेटकेन ऊस बंद करा!

Multibagger Stock: 1 लाखाचे 8.76 लाख करणारा शेअर! फार्मा सेक्टरच्या शेअरने 776% रिटर्न देत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Jio की Starlink? भारतात सॅटेलाइट इंटरनेटसाठी कोणाचे पारडे जड; कोणता रिचार्ज प्लॅन असणार स्वस्त?

SCROLL FOR NEXT