tamannaah bhatia 
मनोरंजन

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या घरात कोरोनाचा शिरकाव

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- देशात कोरोनाचा कहर थांबवण्याचं नावंच घेत नाहीये. कोरोनाच्या संकटातून बॉलीवूड देखील वाचलेलं नाही. काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनाच्या विळख्यात आणखी एका अभिनेत्रीचं कुटुंब सापडलं आहे. 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या घरात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या घरी कोरोनाच्या शिरकाव झाला असून तिच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः तमन्नाने सोशल मिडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. बुधवारी तमन्नाने एक पोस्ट शेअर करत म्हटलं की तिचे वडिल संतोष आणि आई रजनी यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. या टेस्टमध्ये दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. तमन्नाचे आई-वडिल दोघेही पॉझेटीव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबतंच कर्मचारी आणि स्वतः तमन्नाने देखील कोरोनाची टेस्ट केली होती. या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 

तमन्नाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, माझ्या पालकांमध्ये कोविड १९ ची लक्षण दिसत होती. सुरक्षेच्या कारणास्तव घरातील सगळ्यांची टेस्ट लगेचच केली गेली. आता रिपोर्ट आले आहेत. दुर्देवाने माझ्या आई-वडिलांचा रिपोर्च पॉझिटीव्ह आला आहे. अधिका-यांना याबद्दल माहिती दिली गेली आहे. आम्ही सगळ्या नियमांचं पालन करत आहोत. कुटुंबातील इतर सदस्य, कर्मचारी वर्ग आणि माझी स्वतःची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. देवाच्या कृपेने ते कोरोनाशी उत्तम प्रकारे लढत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना आणि आशिर्वाद त्यांना व्यवस्थित करण्यात मदत करतील.

तमन्नाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिच्या पालकांसाठी प्रार्थना केल्या आहेत. तसंच तिला अशा परिस्थितीत हिंमत ठेवण्याचा सल्ला देखील देत आहेत.   

tamannaah bhatia parents tested positive for covid 19  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT