Tarak Mehta Sakal
मनोरंजन

‘तारक मेहता...’ नव्या कलाकारांच्या शोधात

प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील कलाकार प्रेक्षकांमध्ये इतके लोकप्रिय झाले की, त्यांना त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानू लागले आहेत. मालिकेतील कलाकारांना खऱ्या नावाने नव्हे, तर त्यांच्या पात्रांच्या नावाने ओळखले जाते. मालिकेच्या निर्मात्यांसमोर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे आणि मालिकेचा टीआरपी कोणत्याही प्रकारे वाचवणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. काही महिन्यांत अनेकांनी ही मालिका सोडली. त्यानंतर त्याच्या टीआरपीमध्ये लक्षणीय घट झाली. पण गेल्या आठवड्यात या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० शोमध्ये प्रवेश केला आहे.

आता मालिकेमधून हरवलेल्या कलाकारांना लवकरात लवकर परत आणण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत. गोकुळधाम सोसायटी पूर्ण व्हावी आणि संपूर्ण टीम एकत्रितपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल, असा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी निर्माते नवीन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार करत आहेत. मालिकेमध्ये दया बेनची मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी, अंजली भाभी ऊर्फ ​नेहा मेहता, तारक मेहता यांची भूमिका साकारणारा शैलेश यांचाही या कलाकारांमध्ये समावेश आहे. प्रत्येक जण मालिकेमधून बाहेर पडताना पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला. अलीकडेच या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही याला निरोप दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT